खानापूर जवळील अपघातात शालेय विद्यार्थी ठार ,एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 07:14 PM2018-08-23T19:14:06+5:302018-08-23T19:14:49+5:30

मालट्रकची पाठीमागून जोरात धडक होऊन मोटरसायकलवरील एक जण ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला.

School students death in accident near Khanapur, one injured | खानापूर जवळील अपघातात शालेय विद्यार्थी ठार ,एक जखमी

खानापूर जवळील अपघातात शालेय विद्यार्थी ठार ,एक जखमी

Next
ठळक मुद्देयाप्रकरणी मालट्रक चालकास पोलीसांनी ताब्यात

खडकवासला :  खानापूर (ता.हवेली ) जवळ खानापूर- रांजणे रस्त्यावर गुरूवारी (दि.२३) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात तन्मय बाळू शिंदे ( वय 14  रा. आंबेड ,ता. वेल्हे ) हा विद्यार्थी जागीच ठार झाला. तर मोटरसायकल चालक निलेश बाळू जागडे हा तरूण जखमी झाला. तन्मय हा आंबेड येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होता. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी खानापूरजवळ हा अपघात घडला. खानापूर येथे केस कापण्यासाठी तो निलेश जागडे याच्या सोबत मोटरसायकलवरून खानापूर येथे चालला होता. मणेरवाडीच्या हद्दीत तिरंगा हाँटेल जवळ  मालट्रक (जीजे ०२. व्ही. व्ही ०५७५ ) ची पाठीमागून जोरात धडक होऊन मोटरसायकलवर पाठीमागे बसलेला तन्मय हा गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडला. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व पोलीस  नाईक किरण बरकाले यांनी घटनास्थळी धाव घेतली. तन्मय याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी हवेली पोलीसांनी ससून रूग्णालयात नेला.या प्रकरणी मालट्रक चालकास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी हवेली पोलीस तपास करत आहेत. 

Web Title: School students death in accident near Khanapur, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.