सासवडच्या तेल्या भुत्याच्या कावडीच्या बैलगाडीला अपघात, नीरेत पिकअप टँम्पोने दिली धडक, बैल जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2023 10:32 PM2023-04-08T22:32:20+5:302023-04-08T22:32:35+5:30

नीरा-लोणंद रोडवरील पुरंदर नागरी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर हा अपघात घडला. पिकअप लोणंद बाजूने येत होता.

Saswad's Telya Bhutya Kavadi bullock cart accident in nira | सासवडच्या तेल्या भुत्याच्या कावडीच्या बैलगाडीला अपघात, नीरेत पिकअप टँम्पोने दिली धडक, बैल जखमी 

सासवडच्या तेल्या भुत्याच्या कावडीच्या बैलगाडीला अपघात, नीरेत पिकअप टँम्पोने दिली धडक, बैल जखमी 

googlenewsNext

नीरा : शिखरशिंगणापूर येथून परतणाऱ्या कावडीच्या बैलागाडीला पिकअपने धडक दिली. यात एक बैल जखमी झाला आहे. नीरा-लोणंद रोडवरील पुरंदर नागरी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर हा अपघात घडला. पिकअप लोणंद बाजूने येत होता.

मागील आठवड्यात शिखरशिंगणापूरची कावड यात्रा झाली. मानाची असलेली सासवड येथील तेल्या भुत्याची कावड परतीच्या प्रवास करत आहे. शनिवारी रात्री आठच्या सुमारास कावड यात्रेतील १८ बैलगाड्या बारामती तालुक्यातील प्रवास उरकून नीरा येथील प्रभाग सहा मध्ये मुक्कामासाठी येत होत्या. त्यातील तिसऱ्या बैलगाडीला भरधाव टँम्पोने धडक दिली. 

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार लोणंद (सातारा) बाजूने येणाऱ्या पिकप टँम्पो (क्रमांक एम.एच. ४६- बी.एम. ३६१८) ने तिसऱ्या क्रमांकाच्या बैलगाडीच्या उजव्या बाजूला जोरदार धडक दिली. यात उजव्या बाजूचा बैल गंभीर जखमी झाला आहे. बैल रस्त्यावरच पडून राहिल्याने काही काळ वाहतूक बंद होती. नीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले, पशुवैद्य जगतापही उपचारासाठी घटनास्थळी आले होते. बैलावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. टँम्पोचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करत आहेत. 
 

Web Title: Saswad's Telya Bhutya Kavadi bullock cart accident in nira

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.