आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2024 07:31 AM2024-06-09T07:31:55+5:302024-06-09T07:32:53+5:30

Daily Horoscope: जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस...

Daily Horoscope 9 June 2024 love life prediction career guidance astrology zodiac sign | आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!

आजचे राशीभविष्य, ९ जून २०२४: घरातील वातावरण आनंददायी राहिल, पण वाणी संयमित ठेवा!

मेष - आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. आणखी वाचा

वृषभ - आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल. आणखी वाचा

मिथुन - आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल. आणखी वाचा

कर्क -  आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. आणखी वाचा

सिंह -  आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील. आणखी वाचा

कन्या -   आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. आणखी वाचा

तूळ - आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. आणखी वाचा

वृश्चिक -  आज शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आणखी वाचा

धनु - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आणखी वाचा

मकर - आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आणखी वाचा

कुंभ - आज आपल्यात कले विषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. आणखी वाचा

मीन - आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील.  आणखी वाचा

Web Title: Daily Horoscope 9 June 2024 love life prediction career guidance astrology zodiac sign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app