हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पुण्यातील सांगवी सांडसमध्ये धाड; फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:41 PM2017-12-16T12:41:46+5:302017-12-16T12:47:02+5:30

पोलिसांच्या सहकार्याने सांगवी सांडस येथील महिलांनी नाव्ही सांडस येथील विक्री होत असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून दारूच्या फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त केले.

raid on liquor spot in sangvi sandas, pune; women arrested by loni kand police | हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पुण्यातील सांगवी सांडसमध्ये धाड; फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त

हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर पुण्यातील सांगवी सांडसमध्ये धाड; फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त

Next
ठळक मुद्देबीट अंमलदार यांच्याच आशीर्वादाने बेकायदेशीर दारू विक्री?पोलिसांनी एका महिले विरुद्ध केली कारवाई, नागरिकांमधून समाधान

पिंपरी सांडस : पोलिसांच्या सहकार्याने सांगवी सांडस येथील महिलांनी नाव्ही सांडस येथील विक्री होत असलेल्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड टाकून दारूच्या फुग्यांसह साहित्य उद्ध्वस्त केले. याबाबत नागरिकांमधून समाधान जरी व्यक्त केले जात असले तरी बीट अंमलदार यांच्याच आशीर्वादाने बेकायदेशीर दारू विक्री होत असल्याची परिसरात चर्चा आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नाव्ही सांडस येथे बीट अंमलदार यांच्या आशीर्वादाने खुलेआम बेकायदेशीर हातभट्टीची दारू विक्री मोठ्या प्रमाणावर चालू होती. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष लोणीकंद पोलीस स्टेशनला जाऊन बीट अंमलदार सुभाष गारे यांना सोबत घेऊन सहा ते सात कॅन दारूचे साहित्य व दारूचे फुगे उद्ध्वस्त केले. शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मीना लोले व महिला पुरुषांनी भाग घेतला होता. पोलिसांनी एका महिले विरुद्ध कारवाई केली. 

Web Title: raid on liquor spot in sangvi sandas, pune; women arrested by loni kand police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.