दारु पिऊन आलेल्या वडिलांना मारणाऱ्या मुलाविरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 03:44 PM2017-12-08T15:44:38+5:302017-12-08T15:47:21+5:30

वडिल व मुलात झालेल्या भांडणात मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाला. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

A complaint was filled to the Loni kand police against a boy who was beaten father | दारु पिऊन आलेल्या वडिलांना मारणाऱ्या मुलाविरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

दारु पिऊन आलेल्या वडिलांना मारणाऱ्या मुलाविरोधात लोणीकंद पोलिसांत गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देनवनाथ तुकाराम बोरकर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये दिली फिर्यादमारहाणीत गंभीर जखमी झाल्याने तुकाराम बाबा बोरकर यांचा झाला जागीच मृत्यू

वाघोली : वडिल दारु पिऊन आल्याच्या कारणावरुन वडिल व मुलात झालेल्या भांडणात मुलाने वडिलांच्या डोक्यात लोखंडी पाईपने केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना भावडी (ता. हवेली) येथे मंगळवारी सायंकाली साडेचारच्या सुमारास घडली. या प्रकरणी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
तुकाराम बाबा बोरकर (वय ६०, रा. बोरकर वस्ती) असे मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचे नाव आहे. तर नाना तुकाराम बोरकर यांच्या विरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भावडी बोरकर वस्ती येथे तुकाराम बोरकर हे नाना बोरकर यांच्या घरासमोर दारु पिऊन गेले होते. नाना त्यांच्या वडिलांमध्ये दारु पिऊन घरी यायचे नाही. या कारणावरुन भांडण झाले. या भांडणामध्ये नाना बोरकर याने वडील तुकाराम बोरकर यांच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली. मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी नवनाथ तुकाराम बोरकर यांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना बोरकर यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब टापरे करत आहेत.

Web Title: A complaint was filled to the Loni kand police against a boy who was beaten father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.