Driving and drinking; Solapur court sentenced 10 drivers to education! | दारु पिऊन वाहन चालाविल्याप्रकरणी १० वाहनचालकांना सोलापूरच्या न्यायालयाने ठोठावली शिक्षा !


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ६ : हल्ली मद्य प्राशन करुन वाहन चालवणाºयांची संख्या वाढली आहे, त्यावर पायबंद बसावा म्हणून शहर वाहतूक शाखेने कारवाई करुन न्यायालयात पाठवलेल्या खटल्यातील १० जणांना आज (मंगळवारी) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांनी दोन दिवस कैद व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी २० दिवस कैद भोगावी लागेल, असे निकालात म्हटले आहे.
पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत शहर वाहतूक शाखेच्या वतीने शहरातील वाहतुकीत शिस्त अबाधित राहावी यासाठी शहरभर विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. यात अवैध प्रवासी वाहतूक, विनापरवाना वाहतूक, मद्य प्राशन करुन वाहन चालवणे अशा कारवाया करण्यात  येत असतात. अशाप्रकारे मद्य प्राशन करुन वाहन चालवणाºया वाहनचालकांवर कारवाई करुन शहर वाहतूक शाखा दक्षिण व उत्तर विभागाने न्यायालयात संबंधितांविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. 
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी देशपांडे यांच्या न्यायालयात आज (मंगळवारी) ही सुनावणी झाली. यात दहाही जणांना दोन दिवस कैदेची शिक्षा सुनावली.  
ही कारवाई पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, वाहतूक शाखेच्या सहा. पोलीस आयुक्त वैशाली शिंदे यांच्या आदेशान्वये  पोलीस निरीक्षक जाधव, संतोष  काणे, सपोनि  चेतन  चौगुले,बिरप्पा  भुसनूर,फौजदार आनंद माळाळे , सपोनि विजयानंद  पाटील, मसपोनि सीमा ढाकणे, फौजदार संजय चवरे  व वाहतूक  शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी केली. 
---------------------
यांना झाली शिक्षा 
- मद्य प्राशन करुन वाहन चालवल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाºयांनी शिक्षा सुनावलेल्यांमध्ये अमर जगन्नाथ साळा (रा़ तेलंगी पाच्छा पेठ, सोलापूर), रफिक सय्यद कुरेशी (वय ३८, मौलाली चौक, सोलापूर), सत्यनारायण नरसय्या कोढूर (वय ५५, नवनाथनगर, सोलापूर), शहनशाह सोनप्पा दुमडे (वय ३२, सोरेगाव, सोलापूर), राहुल गौडा पवार (वय २६, मौलाली चौक, सोलापूर), गुरुसिद्ध शिवशंकर बगले (वय ४१, लवंगी, ता. द.सोलापूर), अंबादास यलप्पा जाधव (वय  ४७, उत्कर्षनगर, सोलापूर), राजाराम शिवाजी शेळके (वय ३९, रा. माढा), सिराज समथ खान (वय ३८, नई जिंदगी, सोलापूर), महेश मधुकर कवडे (वय २४, देगाव नाका, सोलापूर) या दहा जणांचा समावेश आहे.