टेस्ट राईडच्या नावाखाली रेसिंग बाईक लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 01:23 AM2019-04-03T01:23:48+5:302019-04-03T01:24:14+5:30

अल्पवयीन मुलगा दहावीचे शिक्षण घेत असून त्याला महागड्या, रेसिंग बाईक चालविण्याची आवड आहे़

Racing Bike Lampas in the name of Test Ride | टेस्ट राईडच्या नावाखाली रेसिंग बाईक लंपास

टेस्ट राईडच्या नावाखाली रेसिंग बाईक लंपास

Next

पुणे : ओएलएक्सवर विक्रीसाठी असणाऱ्या महागड्या मोटारसायकल व रेसिंग बाईक टेस्ट राईडच्या नावाखाली घेऊन पळून जाणाऱ्या १७ वर्षांच्या मुलाला सायबर गुन्हे शाखेने पकडले़ त्याच्याकडून साडेपाच लाखांच्या तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत़

हा अल्पवयीन मुलगा दहावीचे शिक्षण घेत असून त्याला महागड्या, रेसिंग बाईक चालविण्याची आवड आहे़ त्यामुळे तो गाड्या चोरून त्या फिरवत असे व त्यानंतर त्या लपवून ठेवत असल्याचे उघड झाले आहे़ फिर्यादी यांनी आॅगस्ट २०१८ मध्ये ओएलएक्सवर मोटारसायकल विक्रीची जाहिरात दिली होती़ त्यावेळी या अल्पवयीन मुलाने त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला मोटारसायकल खरेदी करायची असल्याचे सांगितले़ त्यांना कात्रज परिसरात भेटायला बोलावले़ तेथे भेटल्यावर त्याने मोटारसायकल आवडली असल्याचे सांगून टेस्ट राईड घेऊन येतो, असे सांगून तो गाडी घेऊन गेला तो परत आलाच नाही़ त्यावेळी फिर्यादी यांना दुचाकी चोरून नेल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ त्यानंतर अशाच प्रकारे आणखी दोन रेसिंग बाईक चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर सायबर गुन्हे शाखेने याचा समांतर तपास सुरू केला़ त्यांनी फिर्यादी यांच्याशी संपर्क साधलेल्या मुलाची माहिती काढली़ त्यात संबंधिताने बनावट खाते उघडून त्याद्वारे फिर्यादींशी चॅटिंग केल्याचे उघड झाले़

सायबर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून या अल्पवयीन मुलाची माहिती मिळविली़ त्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर त्याने तीनही गुन्हे केल्याची कबुली दिली व लपविलेल्या दुचाकी काढून दिल्या़
ओएलएक्सवरून खरेदी-विक्री करताना असे प्रकार होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी केले आहे़
 

Web Title: Racing Bike Lampas in the name of Test Ride

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.