'दुष्काळग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 02:22 AM2018-10-30T02:22:00+5:302018-10-30T02:23:42+5:30

जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

'Provide immediate help to drought-hit villages' | 'दुष्काळग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी'

'दुष्काळग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी'

Next

जुन्नर : जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.

जुन्नर तालुक्याच्या आदिवासी दुष्काळग्रस्त गावांना खासदार आढळराव , अधिकारी यांनी भेटी दिल्या त्यावेळी ते बोलत होते.
दौºयात उपविभागीय अधिकारी अजित देशमुख, कृषिविभागाचे आधिकारी,गटविकास अधिकारी सुधीर भागवत, उपवनसंरक अर्जुन म्हसे, तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.सोबत होते. इंगळून शिवली, उच्छिल, आंबोली, कुकडेश्वर, घाटघर, अंजनावळे येथील भातशेतीची खासदार व आधिकाऱ्यांनी पाहणी केली. अधिकाऱ्यांसोबत दौऱ्यांचा आढावा घेण्यात आला.
पंचायत समिती सभापती ललिता चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे , आशा ताई बुचके ,गुलाब पारखे ,शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, युवासेनेचे गणेश कवडे चौधरी, संतोष खैरे, पंचायत समिती गटनेते दिलीप गांजळे, काळूराम गागरे,जुन्नरचे नगराध्यक्ष शाम पांडे, नगरसेवक दीपेश परदेशी, समीर भगत, बन्सी चतुर, शिवा खत्री, आदिवासी भागातील सरपंच, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.

आदिवासी भागात भातशेतीचे नुकसान झाले आहे,तसेच इतर भागात देखील खरिपाच्या पिकाचे नुकसान झालेले आहे. पूर्व भागातील पठारावरील पाण्याची समस्या भीषण असल्याने तातडीने उपाययोजना आखण्याच्या सूचना खासदार आढळराव यांनी यावेळी दिल्या.

Web Title: 'Provide immediate help to drought-hit villages'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.