राष्ट्रपतिपदक : पुणे जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश , गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 06:12 AM2018-01-26T06:12:39+5:302018-01-26T06:13:04+5:30

पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस दलातील पाच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे़

 President's Medal: Five people from Pune district, honor of quality police service | राष्ट्रपतिपदक : पुणे जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश , गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेचा गौरव

राष्ट्रपतिपदक : पुणे जिल्ह्यातील पाच जणांचा समावेश , गुणवत्तापूर्ण पोलीस सेवेचा गौरव

Next

पुणे : पुणे शहर व जिल्ह्यातील पोलीस दलातील पाच पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना प्रजासत्ताक दिनी गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे़
बिनतारी संदेश विभागातील पोलीस निरीक्षक भीम वामन छापछडे, राज्य महामार्ग विभागाचे पोलीस निरीक्षक सुधीर प्रभाकर अस्पत, बिनतारी संदेश विभागातील सहायक फौजदार विक्रम निवृत्ती काळे, पुणे मुख्यालयातील सहायक फौजदार जयसिंगराव खाशाबा संकपाळ-यादव, वाहतूक शाखेतील सहायक फौजदार सोमनाथ रामचंद्र पवार अशी विशेष व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत हे १९८९ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले़ त्यांना आतापर्यंतच्या सेवाकाळात उत्कृष्ट सेवेबद्दल २४५ बक्षिसे मिळाली असून गुन्हे प्रकटीकरणाच्या कामगिरीबाबत २००३ मध्ये पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळाले आहे़
पोलीस निरीक्षक भीम छापछडे हे १९८२मध्ये पोलीस हवालदार वायरलेस आॅपरेटर म्हणून भरती झाले़ त्यांना आतापर्यंत १०९ बक्षिसे मिळाली आहेत़
सहायक पोलीस फौजदार विक्रम काळे हे १९८३ मध्ये शिपाई म्हणून भरती झाले असून त्यांना आतापर्यंत ३२५ बक्षीसे मिळाली आहेत़ त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०१० मध्ये पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह मिळाले आहे़
सहायक पोलीस फौजदार जयसिंग संकपाळ हे १९८१ मध्ये शिपाई म्हणून पुणे शहर पोलीस दलात भरती झाले़ त्यांना आतापर्यंत २०७ बक्षिसे मिळाली आहेत़
सहायक पोलीस फौजदार सोमनाथ पवार हे १९८१मध्ये राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ७ दौंड येथे पोलीस शिपाई म्हणून भरती झाले़ २००७मध्ये त्यांची पुणे
शहर पोलीस दलात बदली झाली़ त्यांना आतापर्यंत १५५ बक्षिसे मिळाली आहेत़

Web Title:  President's Medal: Five people from Pune district, honor of quality police service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.