मुंबईतील शक्तीप्रदर्शनाचे पुण्यात नियोजन    

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 09:22 PM2018-03-17T21:22:39+5:302018-03-17T21:22:39+5:30

मुंबईत ६ एप्रिल रोजी भाजपाचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे.पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे

Planning of power demonstration in mumbai programme at Pune | मुंबईतील शक्तीप्रदर्शनाचे पुण्यात नियोजन    

मुंबईतील शक्तीप्रदर्शनाचे पुण्यात नियोजन    

Next
ठळक मुद्देभाजपाचा वर्धापनदिन: पालकमंत्री गिरीश बापट यांचा पुढाकार

पुणे: भारतीय जनता पार्टीच्या मुंबईत होणाºया वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला जिल्हा व परिसरातून कार्यकर्ते नेऊन शक्तीप्रदर्शन करण्याचे नियोजन पुण्यात शनिवारी करण्यात आले. पालकमंत्री गिरीश बापट यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. गेल्या वर्षभरात मुंबईत मराठा क्रांती मोर्चासह अनेक भव्य मोर्चे निघाले. नुकताच शेतकऱ्यांचाही मोर्चा निघाला. त्या पार्श्वभूमीवर भाजपानेही या वर्धापनदिनाला मोठी गर्दी जमवण्याचे ठरवले आहे.
पक्षनेतृत्त्वानेच तसे स्पष्ट आदेश राज्यातील सर्व जिल्हा तसेच शहर भाजप शाखांना दिले आहे. तसेच खासदार,आमदारांसह सत्तेत असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची व्यवस्था करावी ;असेही सांगण्यात आले आहे. त्याप्रमाणे बापट यांनी शनिवारी सकाळी डीपी रस्त्यावरील एका मोठ्या कार्यालयात नियोजनाची बैठक घेतली. पुणे तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, पक्षाचे आमदार, खासदार यांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. ७०० पेक्षा जास्त पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. 
मुंबईत ६ एप्रिल रोजी भाजपाचा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणावर साजरा केला जाणार आहे.पक्षाध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यक्रम होणार आहे.अध्यक्षांकडून थेट गर्दी जमविण्याचे आदेश मिळाल्याची माहिती आहे.देशातील बहुसंख्य राज्यात आता भाजपाची सत्ता आहे. तरीही संघटनेच्या स्तरावर पक्षाचे अस्तित्व बळकट असल्याचे जनतेला पटवून देणे आवश्यक आहे व त्यासाठी वर्धापनदिन ही संधी असल्याचे पदाधिकाºयांना कळविण्यात आले आहे.
पुणे तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व भागातून किमान ५ लाख कार्यकर्ते  या कार्यक्रमाला उपस्थित असावेत असे सुचित करण्यात आले आहे. त्यामुळेच बापट यांनी पुढाकार घेत ही बैठक आयोजित केली. त्यात सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागातील कार्यकर्त्यांची जाण्या येण्याची व्यवस्था करण्यास सांगितले आहे.यासाठी आपापल्या परिसर स्तरावर योग्य ते नियोजन करावे, असे बापट यांनी सर्वांना सांगितले. 


 

Web Title: Planning of power demonstration in mumbai programme at Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.