दुचाकी घसरली आई-वडील वाचले, १२ वर्षीय मुलगा ठार; नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात

By नम्रता फडणीस | Published: March 4, 2024 02:52 PM2024-03-04T14:52:31+5:302024-03-04T14:53:12+5:30

सचिन याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला...

Parents survive, 12-year-old boy killed in bike fall; Accident near New Katraj Tunnel | दुचाकी घसरली आई-वडील वाचले, १२ वर्षीय मुलगा ठार; नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात

दुचाकी घसरली आई-वडील वाचले, १२ वर्षीय मुलगा ठार; नवीन कात्रज बोगद्याजवळ अपघात

पुणे : भरधाव वेगातील दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने सहप्रवासी शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगदा परिसरात घडली. आदित्य सचिन भिंताडे (वय १२, रा. मोडक वस्ती, जांभुळवाडी रस्ता, आंबेगाव बुद्रुक) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहेत.

अपघातात आदित्यचे दुचाकीस्वार वडील सचिन (वय ४३), आई वासंती (वय ३८) जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सचिन पत्नी व मुलासह बाह्यवळण मार्गावरून रविवारी दुपारी साताऱ्याकडे निघाले होते. नवीन कात्रज बोगद्याजवळ सचिन यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्याने सचिन, त्यांचा मुलगा आदित्य, पत्नी वासंती यांना दुखापत झाली. तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन याच्या डाेक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव तपास करत आहेत.

Web Title: Parents survive, 12-year-old boy killed in bike fall; Accident near New Katraj Tunnel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.