नवले पुलाजवळ मराठा समाजाचे आंदोलन; महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली, वाहनांच्या रांगाच रांगा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 02:40 PM2023-10-31T14:40:13+5:302023-10-31T14:42:42+5:30

पोलीस आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र आंदोलक माघार घ्यायला तयार नाहीत

Movement of Maratha community near Navale Bridge; Blocked by burning tires on the highway, queues of vehicles | नवले पुलाजवळ मराठा समाजाचे आंदोलन; महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली, वाहनांच्या रांगाच रांगा

नवले पुलाजवळ मराठा समाजाचे आंदोलन; महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखली, वाहनांच्या रांगाच रांगा

धायरी (पुणे) : शहरात ठिकठिकाणी मराठा आरक्षणासाठी आज आंदोलन केले जात आहे. अनेक ठिकाणी उपोषण सुरू आहे. मुंबई - बंगळुरू महामार्गावरील नवले पूल परिसरात मराठा आंदोलक जमा झाले असून त्यांनी महामार्गावरील दोन्ही बाजू कडील वाहतूक रोखली आहे. या ठिकाणी टायर देखील आंदोलकांनी जाळले.

यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली आहे. आंदोलकांनी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात टायर जाळले असून आंदोलकांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. यामुळे दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. पोलीस आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र आंदोलक माघार घ्यायला तयार नाहीत.

Web Title: Movement of Maratha community near Navale Bridge; Blocked by burning tires on the highway, queues of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.