पुण्यातील खराडीच्या आय टी हब मध्ये डासांचे वादळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 05:39 PM2024-02-12T17:39:40+5:302024-02-13T16:32:43+5:30

खराडी येथील नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय

Mosquito storm in the IT hub of Kharadi A climate of fear among citizens | पुण्यातील खराडीच्या आय टी हब मध्ये डासांचे वादळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ...

पुण्यातील खराडीच्या आय टी हब मध्ये डासांचे वादळ! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा व्हिडिओ...

अश्विनी जाधव - केदारी

पुणे : पुण्यातील खराडी, मुंढवा, केशवनगर,  मांजरी हा सर्व नव्याने विस्तारलेला परिसर, आय टी हब, गगनचुंबी इमारती ही या परिसराची वैशिष्ट्य, त्यामुळेच इथल्या घराना करोडोंच्या किंमती आहेत. मात्र करोडो रुपये खर्च करुन घरं खरेदी करणाऱ्या इथल्या नागरिकांना सध्या डासांच्या प्रादुर्भावाचा मोठा प्रश्न भेडसवतोय, ही दृश्य नीट पाहा वादळ भिरभिरत याप्रमाणे डासांचे थवेच्या थवे आकाशात उंच उडताना दिसताहेत, खराडी, मांजरी या  परिसरात सध्या रोज संध्याकाळी आकाशात डासांचे हे असे मोहोळ बघायला मिळतेय.

खराडी येथील नदीपात्रात वाढलेल्या जलपर्णीमुळे डासांचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.  या भागातील मुठा नदी पाञात जलपर्णीचे साम्राज्य उभारल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. म्हणूनच पालिकेनं ही जलपर्णी तात्काळ काढावी अशी मागणी सातत्याने होतेय, खराडी जवळील मुळा-मुठा नदीपात्रात छोटा बंधारा आहे, तसेच जलशुद्धीकरण प्रकल्प आहे. इथेच मुंढवा खराडीला जोडणाऱ्या पुलाचे काम सुरू आहे. त्याचा भराव नदीपात्रात पडलेला आहे. यासोबतच नदी सुधार प्रकल्प ही मुळा मुठा नदीत सुरू आहे. त्यामुळे पाणी वाहण्याचा वेग कमी झाला आहे आणि पाणी जागेवर साचतंय, महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाने जलपर्णी काढण्याची निविदा वेळेत पूर्ण न केल्यामुळे डासांना येथे पोषक वातावरण मिळालं आणि मोठ्या प्रमाणात डासांची पुनरुत्पत्ती झाली. असा आरोप नागरिकांनी केलाय. खराडी नदीपात्राजवळ डासांचे जे वादळ दिसत आहे, त्याचा काही नागरिकांनी व्हिडियो बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल  करत सोशल मीडियावर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

Web Title: Mosquito storm in the IT hub of Kharadi A climate of fear among citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.