पुणेकरांचे नेटवर्क गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 05:29 PM2018-04-01T17:29:01+5:302018-04-01T17:29:01+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून काॅलड्राप हाेणे, रेंज नसणे अश्या समस्यांना पुणेकरांना सामाेरे जावे लागत अाहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैराण झाले असून यावर लवकरात लवकर उपाय शाेधण्याची मागणी अाता ते करत अाहेत.

mobile network problem in pune city | पुणेकरांचे नेटवर्क गुल

पुणेकरांचे नेटवर्क गुल

googlenewsNext
ठळक मुद्देसातत्याने हाेताेय काॅलड्राॅपफक्त पुण्यातच येताेय हा अनुभव

पुणे : गेल्या अनेक दिवसांपासून पुणेकरांना काॅलड्रापचा तसेच फाेनला नेटवर्क नसल्याचा अनुभव येत अाहे. त्यामुळे पुणेकर पुरते हैरान झाले असून शहर स्मार्ट हाेतंय पण नेटवर्क कंपन्या कधी स्मार्ट हाेणार असा प्रश्न उपस्थित करत अाहेत. 
   गेल्या काही दिवसांपासून सातत्याने काॅल सुरु असातना अचानक कट हाेत असल्याचा अनुभव पुणेकरांना येत अाहे. अनेकदा एखाद्याला फाेन लावल्यास वेगळाच अावज एेकू येत अाहे. त्याचबराेबर फाेरची नेटवर्कचा सगळीकडे बाेलबाला असताना थ्रीजीवर सुद्धा इंटरनेट व्यवस्थित चालत नाहीये. त्यामुळे पैसे फाेरजी चे सुविधा टुजीच्या अशी परिस्थिती पुणेकरांची झाली अाहे. एका क्लुप्तीने लाेकांचे जीवन बदलून टाकणाऱ्या एका कंपनीच्या ग्राहकांमध्ये माेठी नाराजी पाहायला मिळत अाहे. प्रत्येक काॅल हा चालू असताना कट हाेत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत अाहे. अामचं नेटवर्क स्ट्राॅंग अाहे, अामचे सर्वात जास्त ग्राहक अाहेत. फाेरजी मध्ये अाम्ही सर्वात पुढे अाहाेत अश्या माेठ-माेठाल्या जाहीराती करणाऱ्या कंपन्यांचे वास्तव यानिमित्ताने समाेर येत अाहे. 
    याविषयी बाेलताना अनुज देशपांडे हा तरुण म्हणाला, गेल्या अनेक दिवसांपासून काॅल ड्रापचा अनुभव मला येताेय. काॅल सुरु असताना अनेकदा काॅल अचानक कट हाेत अाहे. त्याचबराेबर फाेन ठेवल्यावर काही सेकंदांनी फाेन डिस्कनेट हाेत अाहे. नेटवर्कच्या बाबतीतही सारखाच अनुभव अाहे. सातत्याने नेटवर्क कमी जास्त हाेत असल्याने इंटरनेट अाणि इतर साेशल माध्यमे वापरताना अनेक अडचणी येत अाहेत. मुक्ता लेले म्हणाली, गेल्या दाेन महिन्यांपासून मला हा अनुभव येत अाहे. मला फाेन करणाऱ्यांना माझा फाेन बरेचदा अाऊट अाॅफ कव्हरेज दाखवत अाहे. तर फाेन लागण्यासही अनेक अडचणी येत अाहेत. नाट्यक्षेत्रात मी काम करत असल्याने अनेक कामांचे फाेन केले जातात. मात्र काॅल ड्रापमुळे बाेलणं अर्धवट राहत अाहे. 
    हा अनुभव फक्त पुण्यातच येत अाहे. इतर शहरांमध्ये ही समस्या जाणवत नसल्याचे अनेकांचे म्हणणे अाहे. मुळच्या पुण्याच्या असलेल्या काही दिवसांसाठी मुंबईलला गेलेल्या केतकी लिमये म्हणाल्या, मुंबईमध्ये असताना एकदाही काॅलड्राप झाला नाही. मात्र पुण्यात सातत्याने हा त्रास हाेत अाहे. नाेकरीमुळे दरराेज अनेक लाेकांशी संपर्कात रहावे लागते. परंतु काॅलड्रापमुळे संवाद सातत्याने खंडीत हाेत असून मनस्ताप वाढत अाहे. डीजिटल इंडियाच्या गप्पा मारताना काॅलड्रापसारखी समस्या उद्भवणे यासारखा दुसरा विनाेद नाही. ट्रायने याबाबत तातडीने कार्यवाही करणे अपेक्षित अाहे. 

   यावर अायटी क्षेत्रातील तज्ञ दीपक शिकारपूर म्हणाले, नेटवर्क कंपन्यांचे पुरेसे टाॅवर शहरात नसल्याने या समस्या निर्माण हाेत अाहेत. नेटवर्क कंपन्यांनी अापल्या ग्राहकांनुसार टाॅवरची उभारणी करणे गरजेचे अाहे. त्याचबराेबर इमारतीवर टाॅवर उभारल्याने रेडिएेशनचा त्रास हाेत असल्याचे सांगितले जाते.त्यामुळे नागरिक इमारतींवर टाॅवर उभारण्यास परवानगी देत नसल्याचे चित्र अाहे. महापालिकेने नेटवर्क कंपन्यांसाठी टाॅवर पाॅलसी तयार करायला हवी. टेकड्यांवर या कंपन्यांना टाॅवर उभारण्याची परवानगी द्यायला हवी. जाेपर्यंत पुरेसे टाॅवर उभारण्यात येणार नाहीत ताेपर्यंत ही समस्या कायम राहिल. 

Web Title: mobile network problem in pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.