VIDEO: सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मुंबईत- मनोज जरांगे पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 02:51 PM2024-01-31T14:51:57+5:302024-01-31T14:52:08+5:30

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते....

Maratha society in Mumbai to get reservation for relatives - Manoj Jarange Patil | VIDEO: सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मुंबईत- मनोज जरांगे पाटील

VIDEO: सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मुंबईत- मनोज जरांगे पाटील

पुणे : मला तरुणांच्या वेदना कळत होत्या, त्यामुळे आंदोलन सुरू केले. सगेसोयऱ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज मुंबईत गेला. मला कोणताही राजकीय वारसा नाही. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. माझे शिक्षण बारावी झाले आहे. आरक्षणाचा लढा आम्ही गोदा पट्ट्यातून सुरू केला. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हे आंदोलन मी सुरू केले, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे जरांगे पाटील म्हणाले, अंतरवाली सराटीत शांततेत आंदोलन सुरू केले होते. त्यावेळी आमच्यावर अचानक हल्ला केला होता. आदल्या रात्री पोलिस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी येऊन गेले होते. त्यांनी विनंती केल्यानंतर आम्ही गर्दी कमी केली होती. त्यानंतर हजारो पोलिस आंदोलनस्थळी आले होते. त्यातील काही पोलिस लोकांमध्ये जाऊन धक्काबुक्की केली. त्यानंतर माईकची वायर कट केली. नंतर एकाएकी पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला होता. इतकं निर्दयी सरकार आम्ही कधी पाहिले नव्हते.

भुजबळांनी आरक्षणाचे राजकारण करू नये -

कुणाचे वाटोळे करून आम्हाला मोठे व्हायचं नाही. भुजबळांनी विनाकारण अशा प्रकारचे आव्हानं देऊ नये. भुजबळ आरक्षण मुद्द्यावरून राजकारण करत आहेत, असं जरांगे पाटील म्हणाले. आमच्या नोंदी सापडल्या तरी म्हणतात मागच्या दारातून आलो. आता सापडलेल्या नोंदी चॅलेंज होऊ शकत नाहीत. भुजबळांनी धनगर आरक्षणाबद्दल भूमिका अजून स्पष्ट केली नाही, असा टोलाही जरांगे पाटलांनी लगावला.

Web Title: Maratha society in Mumbai to get reservation for relatives - Manoj Jarange Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.