लोकसभेला मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा; बारामतीकरांना अजित पवारांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2024 01:14 PM2024-02-04T13:14:32+5:302024-02-04T13:15:14+5:30

नुसते इकडे तिकडे फिरणारे खासदार नकोत, विकास कामे करणारे खासदार आपल्याला हवेत

Make the candidate I will field in the Lok Sabha win Ajit Pawarappeal to Baramati citizens | लोकसभेला मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा; बारामतीकरांना अजित पवारांचे आवाहन

लोकसभेला मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा; बारामतीकरांना अजित पवारांचे आवाहन

बारामती: गेली अनेक वर्षे आपण वरिष्ठांच्या विचारांना मान देत त्यांच्या विचारांच्या उमेदवारांना विजयी केले, यापुढील काळात मात्र अजित पवार हाच लोकसभेचा उमेदवार आहे. असे समजून मी उभा करीन त्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीकरांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस विशाल जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन कार्यक्रमात पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे दोन्ही गट बारामती लोकसभा मतदारसंघात आमने सामने येणार असल्याचे संकेत दिले. पवार म्हणाले, मी केलेल्या विकास कामांची मला जर तुम्हाला पावती द्यायची असेल तर या लोकसभेला मी उभा करेन त्या उमेदवाराच्या पाठीशी बारामतीकरांनी खंबीरपणे उभे राहा. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतदारांना भावनिक आवाहन केले जाईल. सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, ही शेवटची निवडणूक आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला जाईल, मात्र भावनिक न होता बारामतीच्या विकासाच्या दृष्टीने कोण उमेदवार विकासाचे प्रकल्प राबवू शकेल, याचा विचार करून बारामतीकरांनी मतदानाचा निर्णय घ्यावा. नुसतेच शेवटची निवडणूक म्हणतात पण शेवटची निवडणूक केव्हा होईल, हेच समजत नाही, असा टोला त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता लगावला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे अतिशय चांगले संबंध आहेत. तुमच्या लोकप्रतिनिधीला थेट देशाचे पंतप्रधान चांगले ओळखतात. त्यामुळे आपल्या विचाराचा खासदार निवडून आला तर विकासाची कामे अधिक वेगाने मार्गी लावण्यासाठी मी पंतप्रधानांकडे आग्रह धरू शकेल. त्यामुळे अजित पवार हेच निवडणुकीला उभे आहेत असे समजून बारामतीकरांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. नुसते इकडे तिकडे फिरणारे खासदार नकोत, विकास कामे करणारे खासदार आपल्याला हवेत, असे म्हणत पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील निशाणा साधला.
 
दरम्यान ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आवाहनातचं बारामती लोकसभा उमेदवार कोण ,या प्रश्नाचे उत्तर दडले आहे . पत्नी सुनेत्रा पवार याच लोकसभेच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार असण्याची शक्यता आता अधिक गडद झाली आहे . शकतील, अशा स्वरूपाची चर्चा बारामतीत सुरू झाली आहे. 

Web Title: Make the candidate I will field in the Lok Sabha win Ajit Pawarappeal to Baramati citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.