माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राम नाईक, कृष्णकुमार गाेयल यांना जीवनसाधना गाैरव पुरस्कार

By प्रशांत बिडवे | Published: February 8, 2024 04:34 PM2024-02-08T16:34:59+5:302024-02-08T16:35:28+5:30

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते जीवनसाधना गाैरव पुरस्कार देण्यात येणार

Lifetime Achievement Award to former President Pratibhatai Patil Ram Naik Krishna Kumar Gayal | माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राम नाईक, कृष्णकुमार गाेयल यांना जीवनसाधना गाैरव पुरस्कार

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, राम नाईक, कृष्णकुमार गाेयल यांना जीवनसाधना गाैरव पुरस्कार

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. विद्यापीठाच्या ७५ वा वर्धापन दिनानिमित्त राजकीय व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याप्रकरणी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक तसेच शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील कामगिरीसाठी कृष्णकुमार गोयल यांच्यासह विविध क्षेत्रातील एकुण ९ व्यक्तींना 'जीवनसाधना गौरव पुरस्कार देउन गाैरविण्यात येणार आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते जीवनसाधना गाैरव पुरस्कार देण्यात येणार आहेत. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, कुलगुरू प्रा.डाॅ. सुरेश गाेसावी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाच्या खाशाबा जाधव इनडोअर हॉलमध्ये शनिवारी दि. १० राेजी सायंकाळी ५ वाजता या कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी कुलगुरूंच्या हस्ते दुपारी २ ते ४ दरम्यान विद्यापीठातील कर्मचारी, परिसंस्था (महाविद्यालय) आणि ‘युवा गौरव पुरस्कार वितरीत केले जातील.

विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनीय याेगदान देणाऱ्या नउ जणांना यंदा 'जीवनसाधना गौरव पुरस्कार' देण्यात येत आहे. त्यामध्ये अॅड. उज्वल निकम कायदा , मिलिंद कांबळे (उद्योजकता व व्यावसायिक) ,अनिल घमाजी मेहेर (शैक्षणिक व कृषी) , सतीशराव शिवाजीराव काकडे देशमुख (शैक्षणिक आणि सामाजिक), प्राचार्य ठकाजी नारायण कानवडे (शैक्षणिक व सामाजिक) आणि हेमंत हरिभाऊ धात्रक (शैक्षणिक व सामाजिक) यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

Web Title: Lifetime Achievement Award to former President Pratibhatai Patil Ram Naik Krishna Kumar Gayal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.