लोणावळ्यात २४ तासात १७२ मिमी पाऊस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 03:18 PM2018-07-05T15:18:58+5:302018-07-05T15:19:50+5:30

गेल्या दोन दिवसापासून जोराचा वारा व पाऊस परिसरात पडत असल्याने जनजीवन विस्कळीत

last 24 hours in Lonavla 172 mm rain | लोणावळ्यात २४ तासात १७२ मिमी पाऊस 

लोणावळ्यात २४ तासात १७२ मिमी पाऊस 

googlenewsNext

लोणावळा : गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा व परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचे आगार असलेल्या घाटमाथ्यावरील लोणावळा शहरात मागील चोवीस तासात तब्बल १७२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून लोणावळा व परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सततधार कोसळणारा पाऊस व वारा यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून इंद्रायणी नदी व डोंगरभागातू वाहणारे नाले हे दुथडी भरुन वाहू लागले आहे. तर वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे पडल्याने विजेचा खोळंबा झाला आहे. गेल्या दोन दिवसापासून जोराचा वारा व पाऊस परिसरात पडत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले असून त्याचा परिणाम जनजीवनावर झाला आहे. पावसामुळे महामार्गांवरील वाहतुक देखील मंदावली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Web Title: last 24 hours in Lonavla 172 mm rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.