लग्नाचे आमिष दाखवत विधवेशी ठेवले शारीरिक संबंध, जमीनही हडपली, दोघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 02:23 AM2018-05-06T02:23:21+5:302018-05-06T02:23:21+5:30

कसलाही आधार नसलेल्या विधवेस मदत करीत असल्याचे भासवत लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिची जमीन जबरदस्तीने विकावयास लावून ते पैसे लाटले. ते मागितल्यानंतर त्या विधवेस मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या आरोपावरून त्या व्यक्तीसह तिची जमीन विकत घेणाºयविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Indapur Crime News | लग्नाचे आमिष दाखवत विधवेशी ठेवले शारीरिक संबंध, जमीनही हडपली, दोघांविरुद्ध गुन्हा

लग्नाचे आमिष दाखवत विधवेशी ठेवले शारीरिक संबंध, जमीनही हडपली, दोघांविरुद्ध गुन्हा

Next

 इंदापूर - कसलाही आधार नसलेल्या विधवेस मदत करीत असल्याचे भासवत लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिची जमीन जबरदस्तीने विकावयास लावून ते पैसे लाटले. ते मागितल्यानंतर त्या विधवेस मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केल्याच्या आरोपावरून त्या व्यक्तीसह तिची जमीन विकत घेणाºयविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रमेश गणपत शिंदे (रा. कळाशी, ता. इंदापूर), शिवाजी दशरथ जगताप (रा. बाभुळगाव, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. मूळच्या बाभुळगावच्या (ता. इंदापूर) व सध्या येथे कल्याण, जि. ठाणे येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय विधवा महिलेने या दोघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी : सन २०११ मध्ये आजाराने तिचा नवरा मरण पावला. नवºयाच्या मागे त्याच्या नावावर बाभुळगावात असणारी पावणेदहा एकर शेतजमीन तिच्या नावावर करण्यास आरोपी रमेश गणपत शिंदे याने तिला सहकार्य केले. त्यामुळे तिचा त्याच्यावर विश्वास बसला.
त्यानंतर तिची इच्छा नसताना सन २०१२ मध्ये त्याने तिला बाभुळगावमधून इंदापूरला राहण्यासाठी नेले. इंदापुरातील कसाब गल्ली, वडार गल्ली, सरस्वतीनगर, निमगाव केतकी व राजवडी (ता. इंदापूर) या ठिकाणी भाड्याने घर घेऊन हे दोघे राहिले.
दरम्यानच्या काळात आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांनंतर त्याने तुझ्या नावावरची जमीन विकून टाकू. पैसे घेऊन लग्न करू, असे तिला सुचवले. त्यास तिने नकार दिला. त्यामुळे त्याने तिला मारहाण करणे व शिवीगाळ व दमदाटी करणे सुरू केले. हिंगणगाव येथील तिच्या नावावरची जमीन दमदाटी करून व तिला जिवे मारण्याची धमकी देऊन दुसरा आरोपी शिवाजी दशरथ जगताप यास विकावयास लावली. जमिनीच्या बदल्यात ठरलेली आठ लाख रुपयांची रक्कमही तिला दिली नाही. त्याबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचा उत्तरे दिली. शिवाजी जगतापदेखील या बाबीमध्ये सहभागी होता.
याच प्रकरणात शिंदे याने फिर्यादीस मारहाण केल्यानंतर ती तेथून मुलीकडे निघून गेली होती. आज आल्यानंतर या दोघांविरुद्ध तिने तक्रार दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Web Title: Indapur Crime News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.