कॉइन टाका, कापडी पिशव्या मिळवा! प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणे महापालिकेचे महत्वाचे पाऊल

By राजू हिंगे | Published: April 23, 2023 02:55 PM2023-04-23T14:55:45+5:302023-04-23T14:57:01+5:30

सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीनचा वापर करून नागरिकांना १० रुपये पासून २० रुपये पर्यंतचे कॉइन टाकून पिशव्या उपलब्ध होणार

Important step of Pune Municipal Corporation to eliminate plastic Drop coins, get cloth bags | कॉइन टाका, कापडी पिशव्या मिळवा! प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणे महापालिकेचे महत्वाचे पाऊल

कॉइन टाका, कापडी पिशव्या मिळवा! प्लास्टिक निर्मूलनासाठी पुणे महापालिकेचे महत्वाचे पाऊल

googlenewsNext

पुणे : प्लास्टिक निर्मूलनासाठी महापालिकेकडून गंभीरपणे पावले उचलली असून त्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता महापालिका पुणेकरांना कापडी पिशव्या वापरण्यास प्रोत्साहन देणार आहे. त्यासाठी सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. या मशीनचा वापर करून नागरिकांना १० रुपये पासून २० रुपये पर्यंतचे कॉइन टाकून पिशव्या उपलब्ध होणार आहेत. लवकरच ही सेवा उपलब्ध केली जाणार आहे.

महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या वतीने प्लास्टिक वापरास प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. यात नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा आहे. सार्वजनिक ठिकाणी नागरिक प्लास्टिकचा सर्रास वापर करताना दिसून येतात. हे टाळण्यासाठी त्यांना कापडी पिशव्या वापरण्याचा पर्याय देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरात सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहेत. बस स्टेशन, रेल्वे स्टेशन, मॉल, विमानतळ, मल्टिप्लेक्स अशा ठिकाणी या मशीन बसवता येतात.

महापालिकेला घनकचरा विभागाच्या माहितीनुसार सीएसआर च्या माध्यमातून अशा ८ मशीन दिल्या जाणार आहेत. त्यांनतर त्या विविध ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. एका मशीनमध्ये १५० कापडी पिशव्या बसू शकतात. नागरिकांना १० रुपये पासून २० रुपये पर्यंतचे कॉइन टाकून पिशव्या उपलब्ध होतील. या पिशव्या तयार करण्याचे काम महापालिका बचत गटांना देणार आहे. त्यातून मिळणारे पैसे गटांना दिले जातील. लवकरच ही सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. असे घनकचरा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. 

Web Title: Important step of Pune Municipal Corporation to eliminate plastic Drop coins, get cloth bags

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.