तातडीने घरं बांधुन द्या, मुठा कालवा दुर्घटनाग्रस्तांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 07:41 PM2018-09-29T19:41:17+5:302018-09-29T19:42:42+5:30

मुठा कालवा फुटल्याने दुर्घटनाग्रस्त झालेल्या नागरिकांनी तातडीने घरे बांधून देण्याची मागणी पालिकेकडे केली अाहे.

Immediately build houses, demand of mutha canal collapse victims | तातडीने घरं बांधुन द्या, मुठा कालवा दुर्घटनाग्रस्तांची मागणी

तातडीने घरं बांधुन द्या, मुठा कालवा दुर्घटनाग्रस्तांची मागणी

Next

पुणे : कुठं दरड पडली, भुकंप झाला, पूर आला अस काही झालं तर शासनाकडून मदत होते. यात वेगळं काही नाही. मात्र त्या मदतीचा फायदा गरजुंनाच होत असल्याचे दिसून येत नाही. मुळा कालव्यातील दुर्घटनेत ज्यांचे घर वाहुन गेले अशांना नुकसान भरपाई देण्याचे शासनाने व पालिकेने कबूल केले आहे. यावर पीडीतांनी ती मदत फारच अपुरी असून आपल्याला नवीन घर बांधुन देण्याची मागणी केली आहे. तसेच पंचनामे करुन घेण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची, असा प्रश्न उपस्थित केला अाहे. 


     गुरुवारी दांडेकर पुलाजवळ मुठा कालव्याला भगदाड पडून वेगाने पाण्याचा प्रवाह झोपडपटीवस्तीत शिरला. यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर तातडीने पालिका व जिल्हा प्रशासनाने घटनास्थळी मदत पुरवली. या मदतीमुळे सध्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाली असून जाहीर करण्यात आलेल्या आर्थिक मदतीविषयी मात्र अनेक पीडीतांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. सगळा संसार पाण्यात वाहून गेला असताना पालिकेकडून अकरा व सहा हजाराची देण्यात येणारी मदत कितपत पुरणार असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय अनेकांचे पंचनामे अद्याप बाकी असून ते तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. दरवेळी पालिका व प्रशासनाकडून मदत जाहीर केली जाते. परंतु प्रत्यक्षात ती मिळण्याची शाश्वती शंकास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाची मदत याविषयी माहिती देताना स्थानिक रहिवाशी महेश ननावरे यांनी सांगितले, पाण्याच्या प्रवाहात ज्यांची घरे गेली आहेत त्यांना प्राधान्यक्रमाने घरे मिळण्याची व्यवस्था पालिकेने करावी.  आपला सगळा संसार पाण्यात गेला असताना प्रशासनाने कमी मदत देवून उगाच त्यांची थट्टा करु नये. प्रमोद कुंभार यांचे दांडेकर पुलवस्ती याठिकाणी स्वत:च्या मालकीचे गॅरेज असून त्यांनी अद्याप अनेक गाड्यांचे पंचनामे बाकी असल्याचे सांगितले. जोरदार पाण्याच्या प्रवाहाने अनेक गाड्यांची इंजिने वाहून गेली. यावर शासन जी काही मदत करणार आहे ती कितपत पुरी पडणार आहे? असा सवाल त्यांनी केला. 


     दरम्यान दोन दिवसानंतर घटनास्थळाची पाहणी केली असता पालिकेच्यावतीने स्वच्छतेची काम करण्यात आले होते. त्यात अनेक ठिकाणी अद्याप स्वच्छता बाकी होती. त्यामुळे दुर्गंधी पसल्याने त्वरीत साफसफाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली. कालव्या फुटीनंतर विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. शनिवारपर्यत तो बंद असल्याचे दिसून आले. तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत होता. शहरातील विविध सेवाभावी संघटनांनी पीडीतांना जेवण उपलब्ध करुन दिले. शनिवारी दुपारी दुरुस्तीच्या कामाकरिता कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते. यामुळे पुन्हा या वस्तीतील काही ठिकाणी पाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांनी मनस्ताप व्यक्त केला.  

तातडीने घर द्या...बाकीचे कष्टाने मिळवू
घरातील ज्या वस्तु पाण्यात वाहून गेल्या त्यांची किंमत पालिकेने जाहीर केलेल्या मदतीपेक्षा जास्त आहे. सहा आणि बारा हजाराच्या मदतीने काय होणार आहे? वाट्ल्यास ते पैसे देऊ नका. पण आमची घरे तेवढी लवकरात लवकर बांधुन द्या. बाकी आम्ही आमचे कष्टाने मिळवु. जिथे घरातला देव वाचविण्यासाठी वेळ नाही मिळाला तिथे मौल्यवान वस्तुंची काय गोष्ट. घरातली माणसे वाचली ते महत्वाचे. अशी आर्त भावना पीडीत सिंधु जाधव यांनी व्यक्त केली. 

Web Title: Immediately build houses, demand of mutha canal collapse victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.