पत्नीकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळला पती; अखेर घेतला टोकाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 03:57 PM2022-11-15T15:57:03+5:302022-11-15T15:57:10+5:30

पत्नीसह सासरच्या मंडळींवर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Husband fed up with wife's frequent demands for money Finally took the extreme decision | पत्नीकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळला पती; अखेर घेतला टोकाचा निर्णय

पत्नीकडून वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला कंटाळला पती; अखेर घेतला टोकाचा निर्णय

googlenewsNext

पुणे : पत्नी आणि तिच्या माहेरच्या जाचाला कंटाळून पतीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील खडकी भागात घडला. समीर नाईक (३८) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी समीर यांचे वडील निवृत्ती नाईक यांनी पोलिसात तक्रार दिली आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर नाईक यांचे उषा या महिलेशी विवाह झाला होता. त्यांना एक १२ वर्षाची मुलगी देखील आहे. मात्र गेल्या ४ वर्षांपासून उषा आणि तिच्या माहेरचे लोक समीर याला वारंवार पैश्याची मागणी करायचे आणि त्यावरून त्यांच्या मध्ये अनेक वेळा वाद देखील झाले. काही रक्कम दिल्यानंतर सुद्धा उषा आणि तिच्या नातेवाईकांनी समीरला वारंवार आणखी पैश्याची मागणी करायचे. या गोष्टीचा मानसिक त्रास समीरला होऊ लागला आणि त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. समीर यांच्या पत्नी उषा नाईक यासह सासरची मंडळी यात सरसाबाई पंढरकर,  रामचंद्र पंढरकर, मालसिंग आढाव यांच्यावर खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: Husband fed up with wife's frequent demands for money Finally took the extreme decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.