रेशनचे दुकान बदलायचेय? ‘मेरा रेशन’वरून करा 'असा' अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2022 01:15 PM2022-01-04T13:15:00+5:302022-01-04T13:16:31+5:30

या नवीन ॲपमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये घर बसल्या बदल करता येणार आहेत

how to change ration shop apply from mera ration app | रेशनचे दुकान बदलायचेय? ‘मेरा रेशन’वरून करा 'असा' अर्ज

रेशनचे दुकान बदलायचेय? ‘मेरा रेशन’वरून करा 'असा' अर्ज

Next

पुणे : केंद्र शासनाने कोरोना काळात ‘वन नेशन, वन रेशन कार्ड’ ही योजना सुरू केली. त्याला पूरक म्हणून सुुरू केलेल्या ‘मेरा रेशन’ या स्वतंत्र ॲपद्वारे नागरिकांची बहुतेक सर्व कामे घरबसल्या ऑनलाईन करता येणार आहेत.

या नवीन ॲपमुळे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतर झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये घर बसल्या बदल करता येणार आहेत. रेशन कार्ड स्थलांतर केल्यानंतर तुम्ही कोणत्या धान्यासाठी पात्र आहात, तुमच्या लगतच्या परिसरातील रेशन दुकानाचा पत्ता ही माहितीही घरबसल्या मिळणार आहे.

ॲप डाऊनलोड कसे करणार?

केंद्र शासनाने सध्या अँड्राॅइड स्मार्टफोनसाठी ‘मेरा रेशन’ मोबाईल ॲप सुरू केले आहे. ते गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येईल.

‘मेरा रेशन’ ॲपवर नव्या रेशन कार्डसाठीही अर्ज

‘मेरा रेशन’ ॲपवर आता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. रेशन कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात, सुविधा केंद्रात हेलपाटे मारावे लागणार नाहीत.

- जिल्ह्यातील रेशन दुकाने : १८१५

- जिल्ह्यातील रेशनकार्डधारक : ८९३४२४

- अंत्योदय रेशन कार्ड : ४८८०६

- केशरी : २८८२९२

- प्राधान्य कुटुंबे : ५२८७५३

नागरिकांच्या सोयीचे ॲप

“मेरा रेशन ॲप लोकांच्या सोयीचे असून, लोकांना घरबसल्या अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. नव्या रेशन कार्डासाठी ऑनलाईन अर्ज करणे, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाल्यास रेशन कार्ड ट्रान्स्फर करणे, आपल्या परिसरातील रेशन दुकान कोठे आहे, आदी माहिती घरबसल्या मिळणार आहे.”

- सुरेखा माने, जिल्हा पुरवठा अधिकारी

Web Title: how to change ration shop apply from mera ration app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.