एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्णांनाच दहावीत वाढीव गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 01:25 AM2018-12-21T01:25:39+5:302018-12-21T01:26:08+5:30

नियम बदलला : दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक

Elementary, Intermediate Examination passed student get marks | एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्णांनाच दहावीत वाढीव गुण

एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्णांनाच दहावीत वाढीव गुण

googlenewsNext

वाडा : मुंबई कला संचालनालयाच्या वतीने शासकीय एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन चित्रकला परीक्षा घेतल्या जातात. यांपैकी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना दहावीत वाढीव गुण मिळत होते; मात्र आता दोन्ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच वाढीव गुण मिळणार आहेत.

पूर्वीपासून शासकीय चित्रकला परीक्षा घेतल्या जातात. एलिमेंटरी व इंटमिजिएट या दोन्हींपैकी एकाही परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाला, तर दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण मिळत असल्याने या परीक्षांना बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढली होती. याशिवाय, चित्रकलेच्या फाउंडेशन, एटीडी, एएम, जी डी आर्ट, कमर्शियल आर्ट, डीपीएड आदी चित्रकलेसंदर्भातील कोर्सेससाठी इंटरमिजिएट परीक्षेचे प्रमाणपत्र आवश्यक असते. शिवाय, अन्य विविध कोर्सच्या प्रवेशासाठी या प्रमाणपत्राचे वाढीव गुण मिळत होते. त्यामुळे या परीक्षेला बसणाºया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. चालू वर्षापासून मात्र जे विद्यार्थी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांना बसले असतील. त्या विद्यार्थ्यांनाच दहावीच्या निकालात चित्रकला परीक्षेचे वाढीव गुण मिळणार आहेत.

एलिमेंटरी ही चित्रकलेतील महत्त्वाची परीक्षा आहे. ही परीक्षा दिल्याने इंटरमिजिएट परीक्षेत विद्यार्थ्यांना चांगली श्रेणी मिळविण्यास अधिक सोपे होते.
- श्रावण जाधव,
जिल्हाध्यक्ष,
पुणे जिल्हा कलाध्यापक संघ

दोन्ही परीक्षा उत्तीर्ण केल्या तरच दहावीत वाढीव गुण देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. त्यामुळे दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थी चित्रकलेकडे वळतील.
- किरण सरोदे, अध्यक्ष, पुणे जिल्हा कलाशिक्षक संघ
 

Web Title: Elementary, Intermediate Examination passed student get marks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे