शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ज्येष्ठ महिलेला अडीच कोटींचा गंडा

By भाग्यश्री गिलडा | Published: March 15, 2024 03:29 PM2024-03-15T15:29:39+5:302024-03-15T15:30:21+5:30

महिलेला शेअर मार्केट मध्ये गुंतवून केल्यास चांगले परतावा मिळेल असे आमिष दाखवले

Elderly woman earns 2.5 crores in share market trading | शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ज्येष्ठ महिलेला अडीच कोटींचा गंडा

शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये ज्येष्ठ महिलेला अडीच कोटींचा गंडा

पुणे : शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या नादात एका ज्येष्ठ महिलेने अवघ्या दीड महिन्यात तब्बल २ कोटी ८४ लाख ५९ हजार रुपये गमविले आहे. याप्रकरणी सेनापती बापट रोड परिसरात राहणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. १४) सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १५ जानेवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ यादरम्यानच्या काळात घडला आहे. फिर्यादी महिलेला सायबर चोरट्याने फेसबुकवरून संपर्क साधला. शेअर मार्केट मध्ये गुंतवून केल्यास चांगले परतावा मिळेल असे आमिष दाखवले. महिलेने पैसे गुंतवण्यास होकार दिल्यानंतर त्यांना एक लिंक पाठवून व्हाटसअप ग्रुप जॉईन करायला सांगितले. महिलेने व्हात्साप्प ग्रुप जॉईन केल्यावर ट्रेडिंग करण्यासाठी एक ऍप डाऊनलोड करायला सांगितले. यात फिर्यादी यांनी अप्लिकेशन डाउनलोड करून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र तिवारी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी सेबीची आणि मिळालेला नफा आणि पैसे मिळणार नाही अशी भीती दाखऊन आणखी पैसे भरायला सांगितले. मात्र पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर तक्रारदार महिलेने सायबर चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप ग्रुप वरील विविध नंबर, विविध बँक धारका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर चोरटे करत आहेत.

Web Title: Elderly woman earns 2.5 crores in share market trading

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.