नगर- कल्याण महामार्गावर आयशर टेंपो व बोलेरो गाडीची समोरासमोर धडक, १ठार व ३ जखमी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 04:29 PM2018-07-28T16:29:00+5:302018-07-28T16:31:48+5:30

शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान आयशर टेंपो हा भरधाव वेगाने कल्याणकडे जात असताना दोघा वाहनांची समोरासमोर धडक झाली.

eicher Tempo and Bolero jeep accident on Nagar-Kalyan highway, 1 killed and 3 injured | नगर- कल्याण महामार्गावर आयशर टेंपो व बोलेरो गाडीची समोरासमोर धडक, १ठार व ३ जखमी 

नगर- कल्याण महामार्गावर आयशर टेंपो व बोलेरो गाडीची समोरासमोर धडक, १ठार व ३ जखमी 

googlenewsNext

ओतूर : नगर- कल्याण महामार्गावर वाटखळे (ता.जुन्नर) गावाच्या हद्दीत आयशर टेंपो व बोलोरो जीप यांची समोरासमोर धडक झाल्याने गंभीर अपघात झाला. ही घटना शनिवारी पहाटे घडली. या अपघातात १ जण ठार ३ जण गंभीर जखमी झाले आहे.
ओतूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघाताची खबर विशाल उत्तम गाढवे (वय ३२ , गाढवे मळा, ओतूर) यांनी दिली. या अपघातात विनित शांताराम गाढवे वय  रा .ओतूर (ता .जुन्नर ) हे जागीच ठार झाले . तर हर्षल शिरसाट, शिवाजी हरिभाऊ दिघे , मिलिंद साळवे हे तीन जण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. 
मृत विनित गाढवे व तीन जखमी कल्याण- नगर मार्गाने बोलेरो गाडी (एम एच ०४ एफ एफ ५७९३) ने ओतूरकडे येत होते. शनिवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या दरम्यान आयशर टेंपो हा भरधाव वेगाने कल्याणकडे जात असताना दोघा वाहनांची समोरासमोर धडक झाली. पोलीस नाईक पी.डी मोहरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज बनसोडे पुढील तपास करत आहेत.

Web Title: eicher Tempo and Bolero jeep accident on Nagar-Kalyan highway, 1 killed and 3 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.