ऊसदराच्या रकमा १४ दिवसांत जमा करा : साखर आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 08:46 PM2019-11-28T20:46:14+5:302019-11-28T20:46:43+5:30

ऊसाचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत ऊसदराच्या रकमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक

Deposit the amount within 14 days in bank account | ऊसदराच्या रकमा १४ दिवसांत जमा करा : साखर आयुक्त

ऊसदराच्या रकमा १४ दिवसांत जमा करा : साखर आयुक्त

Next

पुणे : ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी ऊसाचा पुरवठा केल्याच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत ऊसदराच्या रकमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणे बंधनकारक आहे. तसेच १५ व्या दिवसापासून ही रक्कम जमा होईपर्यंत विलंबित कालावधीसाठी १५ टक्के व्याजाची रक्कम खात्यात जमा करणे साखर कारखान्यांना बंधनकारक असेल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
कारखान्यांकडील उत्पादित साखर वित्तीय संस्था, लिड बँकेस तारण देऊन बँक खात्यावर कर्ज रक्कम एफआरपी देण्यासाठी उपलब्ध करून दिली जाते. सध्या राज्यातील खासगी व सहकारी साखर कारखाने ऊस बिलाची रक्कम पंधरवडानिहाय देतात. म्हणजे दि. १ ते १५ या पहिल्या पंधरवड्याची रक्कम दि. २८ ते ३० तारखेपर्यंत दिली जाते. दि. १६ ते ३१ या कालावधीतील रक्कम पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत देण्यात येते. या प्रचलित प्रध्दतीमुळे अनेक ऊस पुरवठादारांना त्यांच्या उसाची रक्कम जवळपास २० ते ३० दिवस उशिराने मिळते. त्यामुळे ऊस (नियंत्रण) आदेश १९६६ चे कलम ३ व (३-अ) मधील तरतुदीचा भंग होतो व पर्यायाने ऊस पुरवठादारांकडून व्याजाची मागणी होते. राज्यातील काही साखर कारखाने दर १५ दिवसांनंतरर ऊस पुरवठादार शेतकºयांना ऊस बिलाची रक्कम न देता प्रत्येक ७ दिवसांनी किंवा १० दिवसांनी बँकेकडून कर्ज प्राप्त करून घेतात. त्याआधारे ऊस पुरवठादार शेतºयांना वेळेवर रक्कम देणे शक्य होते. 
साखर कारखान्यांनी गाळप हंगामातील उस बिलाची रक्कम वेळेत देण्यासाठी आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये १४ दिवसाच्या आतील कालावधी निश्चित करावा व त्याप्रमो मालतारण कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेकडे कर्ज उचलीची मागणी करावी, असे गायकवाड यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
------------

Web Title: Deposit the amount within 14 days in bank account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.