महामार्गावर दुचाकीस्वार खड्ड्यात; मदत न मिळाल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2023 11:09 AM2023-04-19T11:09:37+5:302023-04-19T11:09:45+5:30

ठेकेदाराने दक्षता न घेतल्याने तरुणाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला असून संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी कुटुंबीयांची मागणी

Cyclists on highways in potholes; Unfortunate death of youth due to lack of help, a big shock to the family | महामार्गावर दुचाकीस्वार खड्ड्यात; मदत न मिळाल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का

महामार्गावर दुचाकीस्वार खड्ड्यात; मदत न मिळाल्यानं तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, कुटुंबाला मोठा धक्का

googlenewsNext

बारामती : बारामती-इंदापूर मार्गावर लिमटेक येथे पालखी महामार्गासाठी रस्त्याच्या कडेला खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि. १६) रात्री घडली. महेश तुळशीराम ठोंबरे (वय २८ रा. खताळपट्टा, ता. बारामती) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

शनिवारी महेश रात्री साडेअकराच्या सुमारास त्याच्या पल्सर दुचाकीवरून बारामती येथून खताळपट्टा येथील घरी निघाला होता. पालखी महामार्गाचे काम सुरू असल्याने लिमटेक येथे रस्त्याच्या कडेला खड्डे खोदले आहेत. त्या खड्ड्यात पडून महेशचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने दुचाकी खड्ड्यात पडली. त्यात महेश याला तत्काळ कोणाची मदत मिळू शकली नाही. ही घटना पोलिसांना समजल्यानंतर महेश याच्या दुचाकी नंबरवरून पत्ता शोधत पोलिसांनी महेशच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास महेश त्याला रुई ग्रामीण रुग्णालय येथे आणले; मात्र मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी स्पष्ट केले. शव विच्छेदनानंतर त्याच्यावर दुस-या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात एक लहान मुलगा, मुलगी, पत्नी आई-वडील भाऊ असा परिवार आहे.

या परिसरात पालखी महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र, सुरक्षिततेचे कोणतेही नियम पाळण्यात आलेले नाहीत. ठेकेदाराने दक्षता न घेतल्याने महेशचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीय व नातेवाइकांनी केला आहे. बॅरिगेट अथवा सूचना फलक लावले नसल्याने त्यामुळे जाण्या येण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

Web Title: Cyclists on highways in potholes; Unfortunate death of youth due to lack of help, a big shock to the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.