Pune Police: सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या २५० जणांवर गुन्हे शाखेचा वॉच

By नितीश गोवंडे | Published: February 17, 2024 02:30 PM2024-02-17T14:30:35+5:302024-02-17T14:31:18+5:30

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने ही गुन्हेगारांची शाळा भरवण्यात आली होती....

Crime Branch watch over 250 people for glorifying crime on social media | Pune Police: सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या २५० जणांवर गुन्हे शाखेचा वॉच

Pune Police: सोशल मीडियावर गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या २५० जणांवर गुन्हे शाखेचा वॉच

पुणे : शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हे शाखेने शहरातील प्रमुख ११ गुन्हेगारी टोळ्या आणि २१ ‘रायझिंग’ टोळ्यांची पोलिस आयुक्तालयात परेड घेतली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशाने ही गुन्हेगारांची शाळा भरवण्यात आली होती.

यावेळी पोलिसांनी गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या रिल्स सोशल मीडियावर टाकू नका अशा स्पष्ट सूचना दिल्या गुन्हेगारांना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर देखील अशा प्रकारचे रिल्स सोशल मीडियावर अपलोड करण्यात येत आहेत. त्यामुळे आता पोलिसांनी थेट या रिल्स टाकणाऱ्या सोशल मीडियावरील अकाऊंट धारकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी आतापर्यंत २५० हून अधिक सोशल मीडिया अकाऊंटची पडताळणी केली असून, ६० पेक्षा अधिक अकाऊंट्सवरील रील्स व कंटेंट डिलीट केले आहेत, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.

अलीकडच्या काळात गुन्हेगार आणि राजकीय व्यक्तींची जवळी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. गुन्हेगारांनी आपले राजकीय कनेक्शन असल्याची माहिती अप्रत्यक्षपणे पोलिसांना दिली होती. मात्र, पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेतली.

पोलिस आयुक्तांनी कुख्यात गुन्हेगार गजा मारणे, बंटी पवार, नीलेश घायवळ, गणेश मारणे, टिपू पठाण, बंडू आंदेकर, उमेश चव्हाण, बाबा बोडके, अन्वर उर्फ नव्वा, बापू नायर, खडा वसीम या प्रमुख ११ टोळ्यांसह सुमित चौधरी, मामा कानकाटे, योगेश लोंढे, जंगल्या पायाळ, सनी टाक, सनी हिवाळे, गणेश लोंढे, जीवन कांबळे, किरण थोरात, सौरभ शिंदे, कुणाल कालेकर, आकाश भातकर, आप्पा घाडगे, अनिकेत साठे, रोहित भुतडा, विद्या पाडाळे, अनिकेत जाधव अशा ‘उदयोन्मुख टोळ्यांच्या’ म्होरक्यांसह एकूण २६७ गुन्हेगारांची झाडाझडती घेतली होती. या गुन्हेगारांना एकमेकांच्या समोर आणून खास पोलिसी भाषेत ‘समज’ दिली होती. यापुढे गुन्हेगारी कारवाया केल्या अथवा समाज माध्यमात रील्स, व्हिडिओद्वारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केला तर ‘खैर’ नाही असा सज्जड दमच पोलिसांनी त्यांना दिला होता. पोलिस एवढ्यावरच थांबले नाहीत तर गुन्हेगारांनी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलेले रील्स शोधण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांकडून सोशल मीडियावरील वेगवेगळ्या अकाऊंट्सची पडताळणी केली जात आहे. पोलिसांकडून गुन्हेगारांचे सोशल मीडियावरील अकाऊंट ‘मॉनिटर’ करण्यात येत आहेत. गुन्हेगारांच्या रील्स टाकणाऱ्या अकाऊंटवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष दिले जात आहेत. अशा प्रकारचे २५० हून अधिक अकाऊंट पोलिसांनी शोधून काढले असून त्यांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. तसेच गुन्हेगारांकडून ‘गुन्हेगारीचे सोशल मीडियावर उदात्तीकरण करणे चुकीचे असून मी यापुढे कोणतीही रील्स टाकणार नाही, आपण देखील टाकू नका’ अशा प्रकारचे व्हिडिओ देखील तयार करून घेतले जात आहेत. यासोबतच आणखी जवळपास १५० अकाऊंट्सची माहिती घेण्यात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

Web Title: Crime Branch watch over 250 people for glorifying crime on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.