Coronavirus : कोरोना व्हायरस मॅप लिंक उघडू नका, सायबर पोलिसांचे आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:29 PM2020-03-12T22:29:43+5:302020-03-12T22:30:14+5:30

Coronavirus: कोरोना विषाणूची लागण पुण्यात काही जणांना झाली आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे.

Coronavirus: Don't open corona virus map link, calls for cyber police | Coronavirus : कोरोना व्हायरस मॅप लिंक उघडू नका, सायबर पोलिसांचे आवाहन 

Coronavirus : कोरोना व्हायरस मॅप लिंक उघडू नका, सायबर पोलिसांचे आवाहन 

Next

पुणे : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून जगभरात कोठे कोठे कोरोना व्हायरसची लागण झाली आहे, याची माहिती घेण्याचा प्रयत्न नागरिक करीत आहेत. त्याचा गैरफायदा घेऊन सायबर चोरट्यांनी नवा कोरोना व्हायरस मॅप हा मालवेयर तयार केला आहे. त्यांच्या लिंकवर आपण क्लिक केल्यास तो आपल्या संगणकातील गोपनीय माहिती व पासवर्ड चोरण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना व्हायरस मॅप अशी लिंक आल्यास ती उघडण्याचा प्रयत्न करु नका, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

कोरोना विषाणूची लागण पुण्यात काही जणांना झाली आहे. त्यामुळे शहरात चिंतेचे वातावरण आहे. अनेक नागरिक कोरोना विषयीची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचा गैरफायदा घेण्यासाठी सायबर चोरट्यांनी ‘कोरोना व्हायरस मॅप’ असा मालवेअर ऑनलाईन टाकला आहे. ही बाब सायबर सुरक्षा विषयात संशोधन करणा-यांच्या लक्षात आली आहे. यावर आपण क्लिक केल्यास हा मालवेअर आपल्या संगणकात प्रवेश करुन आपली गोपनीय माहिती चोरुन त्याचा गैरवापर करु शकतो, असा इशारा हॅकर्स न्यूजने दिला आहे.

सायबर चोरट्यांनी कोरोना व्हायरस मॅप आॅनलाईन टाकला आहे. यावर आपण क्लिक करताच तो आपल्या संगणकातील अथवा मोबाईलमधील गोपनीय माहिती चोरुन त्याचा गैरवापर करु शकतो़. अद्याप त्याबाबत आम्हाला तक्रार मिळालेली नाही. नागरिकांनी अशा मालवेअरपासून सावध रहावे.
- सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर सेल, पिंपरी चिंचवड

Web Title: Coronavirus: Don't open corona virus map link, calls for cyber police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.