कोरेगाव पार्कमध्ये महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण; हाॅटेलच्या बाऊन्सरसह चौघांविरुद्ध गुन्हा

By विवेक भुसे | Published: April 8, 2023 07:15 PM2023-04-08T19:15:33+5:302023-04-08T19:18:23+5:30

या प्रकरणी चौघांच्या विरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला...

College youth brutally beaten in Koregaon Park; Crime against four including bouncer of hotel | कोरेगाव पार्कमध्ये महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण; हाॅटेलच्या बाऊन्सरसह चौघांविरुद्ध गुन्हा

कोरेगाव पार्कमध्ये महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण; हाॅटेलच्या बाऊन्सरसह चौघांविरुद्ध गुन्हा

googlenewsNext

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील एका हॉटेलमध्ये किरकोळ वादातून महाविद्यालयीन युवकाला बेदम मारहाण करण्यात आली या प्रकरणी चौघांच्या विरुद्ध मुंढवापोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आर्यन रोहित दत्ता (वय १९, रा. वर्षा पार्क सोसायटी, बाणेर ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. आर्यनला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत आर्यनने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार पोलिसांनी रितेश विनायक निम्हण, शंतनू मराठे, किशोर मुने आणि सौरभ जाधव ( सर्व रा. पाषाण ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्यन महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो मित्रांसोबत गेल्या रविवारी दुपारी कोरेगाव पार्कमधील एका हॉटेलमध्ये गेला होता. तेथे त्याच्या मित्राची बाऊन्सरसोबत वादावादी झाली. त्यामुळे ते तेथून दुसऱ्या हॉटेलमध्ये गेले. आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर आर्यन रिक्षाने घरी निघाला. आरोपींनी कल्याणीनगर पुलाजवळ रिक्षा अडवून त्याला बेदम मारहाण केली. या प्रकारानंतर मित्रानी आर्यनला खासगी रुग्णालयात दाखल केले. . सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे तपास करत आहेत.

Web Title: College youth brutally beaten in Koregaon Park; Crime against four including bouncer of hotel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.