‘चाळे’खोर महाराजाची येरवड्यात रवानगी

By Admin | Published: May 31, 2017 01:56 AM2017-05-31T01:56:34+5:302017-05-31T01:56:34+5:30

चव्हाणवाडी (ता. शिरूर) येथील ‘पसायदान गुरुकुल’ या आश्रमातील मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी अटकेत असलेला बाबासाहेब ऊर्फ

'Chale' will send King Maharaj in Yervad | ‘चाळे’खोर महाराजाची येरवड्यात रवानगी

‘चाळे’खोर महाराजाची येरवड्यात रवानगी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरूर : चव्हाणवाडी (ता. शिरूर) येथील ‘पसायदान गुरुकुल’ या आश्रमातील मुलींच्या लैंगिक छळप्रकरणी अटकेत असलेला बाबासाहेब ऊर्फ बाबामहाराज चाळक व त्याचा भाऊ आबासाहेब चाळक यांचा जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला. यामुळे या चाळेखोर बंधूची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. पोलिसांनी पोस्को कलम (९) नुसार कलमे वाढवण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक भीमगौडा पाटील यांनी सांगितले.
आश्रम सोडून गेलेल्या तीन मुलींनी बाबामहाराज व त्याच्या भावाने जून २०१६ ते फेब्रुवारी २०१७ या कालावधीत त्यांचा लैंगिक छळ केल्याची पोलिसात तक्रार केली. जिल्हा न्यायालयाने दोन वेळा त्यांना पोलीस कोठडी दिली. त्यानंतर सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. यामुळे चाळक बंधूंची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली.

पसायदान गुरुकुल आश्रमात ज्या मुलींनी लैंगिक अत्याचाराची तक्रार केली, त्या तालुक्याबाहेरील आहेत. मात्र तिन्ही वेगवेगळ्या तालुक्यांतील आहेत. मुलींच्या या तक्रारीनंतरसुद्धा स्वत:ला समाजसेवी संघटना म्हणवणाऱ्या एकाही संघटनेने याबाबत आवाज उठवला नाही. महिला संघटनाही मूग गिळून आहेत.

Web Title: 'Chale' will send King Maharaj in Yervad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.