चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग : संदीप पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 07:28 PM2018-08-04T19:28:04+5:302018-08-04T19:29:18+5:30

सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली होती.

Chakan arson and violence case transfered to local investigating department: Sandeep Patil | चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग : संदीप पाटील 

चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग : संदीप पाटील 

googlenewsNext
ठळक मुद्देआणखी बारा आरोपीना अटक, चाकण जाळपोळ व हिंसाचार घटनेतील अटक आरोपींचा आकडा तीस 

चाकण : मराठा आरक्षण आंदोलन दरम्यान झालेल्या चाकण येथील जाळपोळ व हिंसाचार घटनेचा तपास स्थानिक अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्याकडे हा तपास वर्ग करण्यात आला आहे. सोमवारी ( ३० जुलै ) झालेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान वाहनांची जाळपोळ व तोडफोड, हिंसाचार प्रकरणी काल ( दि. ३ ) पाच जणांना अटक केल्यानंतर उशिरा आणखी सात जणांना अशी एकूण बारा जणांना अटक करण्यात आली असून मागील तीन दिवसांत अटकेतील आरोपींची एकूण संख्या आता ३० झाली आहे. 
सोमवारी ३० जुलैला मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्यावेळी काही समाजकंटकांनी शासकीय व खासगी वाहनांची तोडफोड करून जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांवरही दगडफेक केली होती. या जाळपोळ व हिंसाचार प्रकरणी शुक्रवारी बारा जणांना अटक केल्यानंतर अटक केलेल्यांची संख्या तीस झाली आहे, त्यापैकी ३ जण अल्पवयीन आहेत. 
याप्रकरणी शुक्रवारी ( दि. ३ आॅगस्ट ) रोजी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे :- ऋषिकेश एकनाथ जगताप ( वय २१, रा.भोसे, गांडेकर वस्ती, ता.खेड, जि.पुणे ), गणेश उर्फ गणपत सतीश मुंगसे ( वय २४, रा.रासे, शिक्रापूर रोड, वलटीप कंपनी समोर, ता.खेड ), स्वप्नील बानू भोर ( वय २२, रा. वाकी बुद्रुक ग्रामपंचायत शेजारी, ता.खेड ), सचिन महादेव शिंदे ( वय १८, रा. शिवम रेसिडेन्सी, आंबेठाण रोड, चाकण ), राहुल दिलीप घोडके ( वय २०, रा. रोहीकर, ता. जि. उस्मानाबाद, सध्या रा. हर्ष हॉटेल, बालाजीनगर, मेघा सेंटर, चाकण ), दीपक युवराज कोरडे ( वय २०, रा.नंदू गोरे चाळ, ऐश्वर्या आंगण समोर, आंबेठाण चौक, चाकण ), जय लालासाहेब ढावरे ( वय १९, रा. दावडमळा, पाण्याच्या टाकीजवळ, चाकण ), अक्षय तानाजी बेंडुरे ( वय २०, रा.दावडमळा, सावतामाळी नगर जवळ, चाकण ), संकेत अरुण व्यवहारे ( वय १८, आंबेठाण चौक, झित्राईमळा, चाकण, मुळ रा.पो. वैराग, ता.बार्शी, जि.सोलापूर ), नागेश गोपीनाथ शिंदे ( वय ३८, वाकी खुर्द, ता.खेड ), नितीन पांडुरंग ढेबे ( वय २१, रा. दावडमळा, चाकण ), ओंकार युवराज कोरडे ( वय १९, रा. आंबेठाण रोड, ऐश्वर्या आंगण समोर, चाकण ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 
जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील व अतिरिक्त पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  दयानंद गावडे, पीएसआय महेश मुंडे व त्यांचे पथक पुढील तपास करीत आहेत. 
=================
 

Web Title: Chakan arson and violence case transfered to local investigating department: Sandeep Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.