सहायक प्राध्यापकपदासाठी ‘पीएच.डी’ची अट रद्द; UGC चा महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 10:16 AM2023-07-06T10:16:35+5:302023-07-06T10:17:30+5:30

या संदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे....

Canceled the condition of 'Ph.D' for the post of Assistant Professor; Important decision of UGC | सहायक प्राध्यापकपदासाठी ‘पीएच.डी’ची अट रद्द; UGC चा महत्त्वाचा निर्णय

सहायक प्राध्यापकपदासाठी ‘पीएच.डी’ची अट रद्द; UGC चा महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

पुणे : विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. सहायक प्राध्यापक पदासाठी आता किमान पात्रता ही नेट, सेट करण्यात आली असून, पीएच.डी ऐच्छिक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी सेट, नेट परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. या संदर्भात यूजीसीचे अध्यक्ष जगदीश कुमार यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

यूजीसीकडून सहायक प्राध्यापक पदांवर थेट भरतीसाठी किमान पात्रता सेट, नेट केली असून, इतर कोणत्याही नियमांत बदल केलेला नाही. विद्यापीठ अनुदान आयाेगाने या संदर्भात ३० जून रोजी अधिसूचना जारी केली आहे. सहायक प्राध्यापकांच्या नियुक्तीच्या नियमातील नवीन बदल १ जुलैपासून लागू करण्यात आले आहेत.

यूजीसीने यापूर्वी २०१८ मध्ये विद्यापीठांसह, महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी पीएच.डी पदवी बंधनकारक करण्यात आली होती. त्यामुळे सेट, नेट उत्तीर्ण उमेदवारांना संधी मिळत नव्हती. त्यामुळे सेट, नेट उमेदवारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. यूजीसीने केलेल्या नवीन सुधारणेमुळे ही अट रद्द केल्यामुळे या उमेदवारांना संधी मिळणार आहे.

Web Title: Canceled the condition of 'Ph.D' for the post of Assistant Professor; Important decision of UGC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.