Breaking: एक्स्प्रेस वेवर भयानक घटना! खंडाळा घाटात टँकर पेटला, इतर गाड्यांनाही आग

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2023 12:41 PM2023-06-13T12:41:20+5:302023-06-13T12:50:47+5:30

Mumbai-Pune Express Way Tanker Fire Accident: पुलाखाली दोन ते तीन कार आगीच्या कचाट्यात सापडल्या आहेत. यामध्ये अनेकजण जखमी किंवा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

Breaking Mumbai-Pune Express Way: The expressway has been blocked for the past one hour! Oil tanker caught fire in Khandala ghat, other vehicles also caught fire fear of deaths | Breaking: एक्स्प्रेस वेवर भयानक घटना! खंडाळा घाटात टँकर पेटला, इतर गाड्यांनाही आग

Breaking: एक्स्प्रेस वेवर भयानक घटना! खंडाळा घाटात टँकर पेटला, इतर गाड्यांनाही आग

googlenewsNext

एक्स्प्रेस वेवर आज भयानक घटना घडली आहे. खंडाळा घाटात एका टँकरला भीषण आग लागली आहे. ही आग पुलाखालील गाड्यांनाही आग लागली असून आगीचे लोळ लांबूनही दिसत आहेत. ही घटना लोणावळा ते खंडाळा दरम्यान असलेल्या कुनेगाव पुलाजवळ घडली आहे.

पुलाखाली दोन ते तीन कार आगीच्या कचाट्यात सापडल्या आहेत. यामध्ये अनेकजण जखमी किंवा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. टँकर ने पेट घेतल्यानंतर त्यातील केमिकल पेटत पुलावरून खाली पडले. तीन जण गंभीररित्या जळाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

चार ते पाच अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या आहेत. अॅम्बुलन्सही आल्या आहेत. परंतू आग मोठी असल्याने मदतकार्य करण्यात अडथळे येत आहेत. गेल्या तासाभरापासून ही आग पेटलेली असून दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली आहे. 



 

बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून सध्या वाहतूक लोणावळा शहरातून वळवली जात आहे. एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते, त्यामुळे बचावकार्य वेगाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सदर अपघातात काही जण दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Read in English

Web Title: Breaking Mumbai-Pune Express Way: The expressway has been blocked for the past one hour! Oil tanker caught fire in Khandala ghat, other vehicles also caught fire fear of deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.