पुण्याच्या सर्वेश नावंदे यास बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 02:09 PM2018-01-29T14:09:46+5:302018-01-29T14:12:00+5:30

प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

Best cadet gold medal for Sarvesh Navande; honorat the hands of Prime Minister Narendra Modi | पुण्याच्या सर्वेश नावंदे यास बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव

पुण्याच्या सर्वेश नावंदे यास बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव

Next
ठळक मुद्देमहाराष्ट्रातून ११२ कॅडेट सहभागी, सर्वेशची बेस्ट कॅडेट म्हणून निवडसंपूर्ण भारतातून दिल्ली मध्ये १७ डिरेक्टरेटचे २५०० पेक्षा जास्त कॅडेट्स सहभागी

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅलीमध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंगमध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक मिळविले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सर्वेश मॉडर्न कॉलेज पुणे येथे बी. एस्सी.  द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिन २०१८च्या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी  सर्वेशने आर. डी. कॅम्पमध्ये आपला सहभाग नोंदविला. नोव्हेंबर २०१७  मध्ये पुणे विभागातून सर्वेशची निवड पुढील कॅम्पसाठी औरंगाबाद येथे झाली. अविरत मेहनत घेऊन विशेष नैपुण्य दाखवल्यामुळे सर्वेश प्रधानमंत्री रॅली मध्ये सहभागास पात्र ठरला. महाराष्ट्रातून ११२ कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते. सर्वप्रथम महाराष्ट्रा मधून सर्वेशची बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली. त्यानंतर संपूर्ण भारतातून दिल्ली मध्ये १७ डिरेक्टरेटचे २५०० पेक्षा जास्त कॅडेट्स यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांसोबत सर्वेशची स्पर्धा होती. यामध्ये लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत या सर्वांमध्ये सर्वेशने एअर फोर्स विंगमध्ये प्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला. संपूर्ण भारतातून एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक प्राप्त झाले.

Web Title: Best cadet gold medal for Sarvesh Navande; honorat the hands of Prime Minister Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.