नीरव मोदीला आळा न घातल्याने तो पळाला - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 05:13 AM2018-04-13T05:13:57+5:302018-04-13T05:13:57+5:30

एक वर्षापूर्वी नीरव मोदीवर धाड टाकली होती तेव्हाच त्याचे गैरव्यवहार उघडकीस आले होते. त्याच वेळी आळा घातला असता, तर आज नीरव मोदी बँकांची फसवणूक करून देशाबाहेर पळाला नसता.

Ajit Pawar ran away after failing to stop Modi - Ajit Pawar | नीरव मोदीला आळा न घातल्याने तो पळाला - अजित पवार

नीरव मोदीला आळा न घातल्याने तो पळाला - अजित पवार

Next

दौैंड/वरवंड (जि. पुणे) : एक वर्षापूर्वी नीरव मोदीवर धाड टाकली होती तेव्हाच त्याचे गैरव्यवहार उघडकीस आले होते. त्याच वेळी आळा घातला असता, तर आज नीरव मोदी बँकांची फसवणूक करून देशाबाहेर पळाला नसता. याला भाजपाचे भ्रष्ट सरकार जबाबदार आहे, असा घणाघाती आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हल्लाबोल सभेत गुरूवारी केला. पालकमंत्री गिरीश बापट यांनी माझा नाद करायचा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपा आणि शिवसेनेच्या भ्रष्ट कारभाराला जनता कंटाळली असून, केवळ जनतेच्या हितासाठी हल्लाबोल आंदोलन करीत आहोत. बापट नेहमी ‘आम्ही काय केले’ म्हणून टीका करीत असतात. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय यांची नव्याने उभारणी तसेच अन्य काही सामाजिक निर्णय आमच्या राजवटीत झाले. तेव्हा गिरीश बापट यांनी विकासाचा फुकटचा आव आणू नये आणि ‘त्यांनी माझा नादच करायचा नाही,’ असे शेवटी पवार म्हणाले.
विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, की केंद्रातील नरेंद्र आणि राज्यातील देवेंद्र यांनी जनतेचा विश्वास गमावलेला आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केली.
धनगर, मराठा, मुस्लिम या समाजांचे आरक्षण केवळ देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या सरकारने दिले नाही.
संसद चालू देत नाही म्हणून पंतप्रधानांना उपोषण करावे
लागते, ही सत्ताधाºयांचीच शोकांतिका आहे.
हल्लाबोल यात्रा ही सर्वसामन्यांचे हित धान्यात ठेवून सुरू करण्यात आली आहे़ भाजपा सरकारच्या कारभारामुळे सर्व स्तरातील जनता भरडली जात आहे़
या यात्रेच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न पुढे येत आहेत़ आगामी लोकसभार व विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला़

Web Title: Ajit Pawar ran away after failing to stop Modi - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.