बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 10:15 AM2023-12-22T10:15:27+5:302023-12-22T10:17:43+5:30

चतु: शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे...

A young man is killed on suspicion of having an immoral relationship with his sister; Excitement by the incident in Pune | बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

बहिणीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाचा खून; पुण्यातील घटनेने खळबळ

- किरण शिंदे

पुणे : बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका 25 वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. पुण्यातील बालेवाडी परिसरात ही घटना घडली. चतु: शृंगी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. 

राजेश कांबळे (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शेषराव रिकामे (वय 20)आणि सय्यद जमीर उर्फ साहिल उर्फ बाब्या सय्यद नुर (वय 20) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका अल्पवयीन तरुणाने तक्रार दिली आहे. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपी राहुल रिकामे याला राजेश याचे आपल्या बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने लोखंडी हत्यारांनी वार करत राजेश कांबळे याला ठार मारले. त्यानंतर त्याची गाडी वाकड येथील नदीमध्ये टाकून देऊन पुरावा नष्ट केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली आहे. अधिक तपास चतु: शृंगी पोलीस करत आहेत

Web Title: A young man is killed on suspicion of having an immoral relationship with his sister; Excitement by the incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.