राज्यातील ५३ कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 08:42 PM2018-07-28T20:42:15+5:302018-07-28T20:59:11+5:30

गेल्या खरीप हंगामात (२०१७-१८) यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतमजूर-शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणी अनेकांना प्राण गमवावे लागले होते.

53 pesticide sellers licence cancelled in the state | राज्यातील ५३ कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द

राज्यातील ५३ कीटकनाशक विक्रेत्यांचे परवाने रद्द

googlenewsNext
ठळक मुद्देकृषी विभागाची कारवाई : सहा कंपन्यांसह, १९८ विक्रेत्यांचा परवाना निलंबित १४.५६ कोटी रुपयांच्या कीटकनाशकांच्या साठ्याच्या विक्रीवर बंदी

पुणे : योग्य दर्जाचे आणि कृषी विभागाने शिफारस कलेल्या प्रमाणे कीटकनाशक उपलब्ध करुन न देणे, नियमाप्रमाणे कीटकनाशकांची साठवणूक न केल्याबद्दल कृषी विभागाने सहा कंपन्यांचे आणि ५३ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले असून, १९८ जणांचे परवाने निलंबीत केले आहेत. याशिवाय १४.५६ कोटी रुपयांच्या कीटकनाशकांच्या साठ्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. 
गेल्या खरीप हंगामात (२०१७-१८) यवतमाळसह विदर्भातील काही जिल्ह्यातील शेतमजूर-शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या हाताळणीमुळे विषबाधा झाली होती. या प्रकरणी अनेकांना प्राण गमवावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत कीटकनाशके उत्पादन व साठवणुक स्थळांची १२ ते १४ जुलै दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यात कीटकनाशके कायदा, १९६८ व कीटकनाशके नियम, १९७१ मधील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्या व विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे. 
या कारवाईत  सहा कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले असून, २ हजार ३४४ प्रकरणांमध्ये १४.५६ कोटींच्या साठ्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून, कीटकनाशकाचा ७ कोटी ४४ लाख ४६ हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी १३ जणांवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, १८६ जणांवर न्यायालयाद दावा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईसाठी ६५ गुणवत्ता नियंत्रकांची नेमणूक करण्यात आली होती. 
------------------- 
अशी राबविली मोहीम
- राज्यातील ३४२ कीटकनाशके साठवणुक स्थळांची एकाचवेळी तपासणी, ६५२ कीटकनाशकांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले
- कीटकनाशकांची योग्य साठवणुक व विक्री करीत नसलेल्या १७ केंद्रांचे परवाने निलंबित अथवा रद्द करण्याची कार्यवाही सुरु
-२ हजार ३४४ प्रकरणांत १४.५६ कोटी रुपयांच्या कीटनाशक साठ्यांच्या विक्रीस बंदी, ७.४४ कोटी रुपयांचा साठा जप्त
-१९८ विक्रत्यांचे परवाने निलंबित, ५३ जणांचे परवाना केले रद्द 
- राज्यात ९ प्रकरणांत कीटकनाशकाच्या १२.७५ टन साठ्यास विक्री बंद 
----------------------

योग्य कीटनाशकांची माहिती येथे पाहा  
पिकांना कोणते कीटनाशक फवारावे याची माहिती mahaagricropsap.gov.inया संकेतस्थळावरील ‘मोबाईल अ‍ॅप न्यू’ मधील ‘क्रॉप क्लिनीकमध्ये’ उपलब्ध आहे. मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर ही माहिती पाहायला मिळेल. या शिवाय ही माहिती ‘ krishi.maharashtra.gov.inया संकेतस्थळावर निविष्ठामधील कीटनाशके या मेन्यूत मिळेल. येथील शिफारशींनुसारच कीटनाशकांचा वापर करावा असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

Web Title: 53 pesticide sellers licence cancelled in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.