गैरसमजातून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 05:22 PM2019-07-15T17:22:18+5:302019-07-15T17:25:08+5:30

दोन तरूण एकमेकांशी भांडत असल्याचा गैरसमज करून तिसऱ्या तरूणाने एकाला मारहाण केली...

Unintentionally beat up to the youth by cement block | गैरसमजातून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

गैरसमजातून तरुणाला सिमेंटच्या गट्टूने मारहाण

Next

पिंपरी : बोलत थांबलेले दोन तरूण एकमेकांशी भांडत असल्याचा गैरसमज करून तिसऱ्या तरूणाने एकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास कासारवाडी येथे घडली. 
  विनेश सुरेश केल्लापण (वय २६, रा, पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शैबाज सिराज कुरेशी (वय २१, रा. कासारवाडी) अमिन फिरोज खान (वय २०,रा. मोमीन पूरा कॅम्प पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनेश आणि शैबाज हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शनिवारी ते दोघेजण कासारवाडी येथे एका हॉटेलच्या मागे बोलत उभे होते. त्यावेळी अमिन तेथे आला. विनेश आणि शैबाज यांच्यामध्ये भांडण सुरू असल्याचा गैरसमज अमिनचा झाला. त्यांने विनेशला चापट मारली. बचावादरम्यान विनेश यांनीही अमिनला धक्काबुक्की केली. शैबाज आणि अमिन हे दोघे मित्र आहेत. अमिनला धक्काबुक्की केल्याच्या रागातून शैबाज आणि अमिन यांनी विनेशला सिमेंटच्या गट्टूने मारहाण केलीय यामध्ये विनेश यांच्या नाकाला जखम झाली. भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत

Web Title: Unintentionally beat up to the youth by cement block

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.