चोवीस तास पाणीपुरवठा डिसेंबरपर्यंत, पिंपरी-चिंचवड महापालिकेची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 03:15 AM2018-04-07T03:15:14+5:302018-04-07T03:15:14+5:30

स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्यातील चाळीस टक्के भागाचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे.

 Twenty-four hours water supply till December, Pimpri-Chinchwad Municipal Corporation plans | चोवीस तास पाणीपुरवठा डिसेंबरपर्यंत, पिंपरी-चिंचवड महापालिकेची योजना

चोवीस तास पाणीपुरवठा डिसेंबरपर्यंत, पिंपरी-चिंचवड महापालिकेची योजना

Next

पिंपरी - स्मार्ट सिटी पिंपरी-चिंचवडची पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली असून, सत्ताधाऱ्यांच्या तोंडचे पाणी पळण्याची वेळ आली आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्यातील चाळीस टक्के भागाचे काम प्रगतिपथावर असून डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. तसेच, मार्चपर्यंत ही योजना नागरिकांसाठी कार्यान्वित होणार आहे. त्यामुळे पाणी टंचाईचे संकट टळण्यास मदत होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी आतापर्यंत सुमारे चाळीस कोटी खर्च झाला आहे.
पुणे आणि मुंबई अशा दोन मेट्रोसिटीच्या मध्यावर असणाºया पिंपरी-चिंचवड महापालिकेची लोकसंख्या २१ लाखांवर पोहोचली़ नागरीकरण वाढल्याने एकमेव स्रोत असणाºया पवना धरणातील साठा कमी पडत आहे. गेल्या दहा वर्षांपासून बंदीस्त जलवाहिनी प्रकल्प लांबला आहे. तसेच भामा आसखेड आणि आंध्रा धरणातून पाणी आणण्याच्या प्रकल्पालाही गती मिळालेली नाही. त्यामुळे चोवीस तास पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीची आवश्यकता आहे.
पवना धरणातून नदीत पाणी सोडून रावेत येथील जल उपसा केंद्रातून जलवाहिन्यांच्या माध्यमातून शहरात पाणीपुरवठा केला जातो. दिवसाला ४६० एमएलडी पाण्याचे आरक्षण आहे. मात्र, लोकसंख्या वाढीचे प्रमाण पाहता पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत आहे. एक मेपासून दिवसाआड पाण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. मात्र, महापौर नितीन काळजे यांनी दिवसाआड पाण्यास विरोध केला आहे. त्यामुळे पाणी कपात होणार की नाही, याबाबत लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी यांच्यात एकमत नसल्याचे दिसून येते. केंद्राच्या जेएनएनयुआरएम अंतर्गत चोवीस तास पाणीपुरवठ्याची योजना सुरू झाली. पहिला प्रयोग यमुनानगर प्राधिकरणात करण्यात आला होता. मात्र, महापालिकेत भाजपाची सत्ता आल्याने शिवसेनेचे वर्चस्व असणाºया वॉर्डातील प्रकल्प प्रशासनाने गुंडाळला होता. त्यास नागरिकांनी विरोधही केला होता. त्यानंतर पहिल्या टप्प्याचे नियोजन महापालिका प्रशासनाने केले होते. या योजनेत या भागातील जलवाहिन्या आणि नळजोड बदलण्याचे काम करण्यात येणार आहे. एचडीपी पाईप आणि नळजोडांसाठी एमडीपी वापरले जाणार आहे.

समान पाणीवाटप
नियोजनाचा अभाव्ताामुळे महापालिका परिसरात पिण्याच्या पाण्याच्या गळतीचे प्रमाण हे चाळीस टक्के आहे. हे प्रमाण कमी करण्यासाठी आणि समान पाणी वाटपासाठी चोवीस तास पाणी योजना राबविली जात आहे. त्यातील चाळीस टक्के भागातील काम दीड वर्षांपासून सुरू आहे.

चोवीस तास पाणीपुरवठा योजनेतील चाळीस टक्के भागाचे काम दीड वर्षांपूर्वी सुरू झाले. ते डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. सध्या पाणीपुरवठ्यावर येणारा ताण कमी होणार आहे. तसेच गळती रोखून समान पाणीवाटप होणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर दुसºया टप्प्यात उर्वरित साठ टक्के भागाचेही काम केले जाणार आहे. त्यातील काही भागांचे काम सुरूही करण्यात आले आहे.
- प्रवीण लडकत, कार्यकारी अभियंता, पाणी पुरवठा विभाग

दाट लोकवस्तीला होणार फायदा
४चोवीस तास पाणी योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोशी, दिघी, भोसरी, प्राधिकरण, चिंचवड, सांगवी या भागात कामे सुरू आहेत. संबंधित भाग हा दाट लोकवस्तीचा असल्याने तसेच या भागात पिण्याच्या पाण्याच्या तक्रारी अधिक आहेत. पहिल्या टप्प्यातील चोवीस तास पाणी पुरवठा योजनेचे काम पहिल्या टप्प्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे या भागांना फायदा होणार आहे. त्यासाठी सुमारे चाळीस कोटी खर्च अपेक्षित असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Web Title:  Twenty-four hours water supply till December, Pimpri-Chinchwad Municipal Corporation plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.