बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या, पतीची अवस्था बघून पत्नीला भोवळ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 08:46 PM2018-05-14T20:46:53+5:302018-05-14T20:46:53+5:30

बोपखेल येथे राहत्या घरात गळफास घेऊन एका लष्करी जवानाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.14) दुपारी 12 वाजता घडली. रामूसिंह शुशपालसिंह राठोड (वय 27, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.             

Soldier get suicide in Bopkhel | बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या, पतीची अवस्था बघून पत्नीला भोवळ 

बोपखेलमध्ये लष्करी जवानाची आत्महत्या, पतीची अवस्था बघून पत्नीला भोवळ 

ठळक मुद्दे लष्करी जवानाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्यापतीने आत्महत्या केलेली पाहून पत्नीची शुद्ध हरपली

 पिंपरी : बोपखेल येथे राहत्या घरात गळफास घेऊन एका लष्करी जवानाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता.14) दुपारी 12 वाजता घडली. रामूसिंह शुशपालसिंह राठोड (वय 27, रा. गणेशनगर, बोपखेल) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.                                                                                             

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ते मूळचा मध्य प्रदेशातील असून सीएमई मध्ये शिपाई म्हणून कामाला होते. पतीने आत्महत्या केलेली पाहून पत्नीची शुद्ध हरपली. तिच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. दिघी पोलिस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Soldier get suicide in Bopkhel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.