राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 01:18 PM2018-10-23T13:18:25+5:302018-10-23T13:20:05+5:30

जुना मुंबई- पुणे महामार्गावर अहिरवडे फाटा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत वन्यप्राणी सांबराचा मृत्यू झाला.

Sambar's death in accident on the national highway | राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर वाहनाच्या धडकेत सांबराचा मृत्यू

Next

कामशेत : जुना मुंबई- पुणे महामार्गावर अहिरवडे फाटा येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत वन्यप्राणी सांबराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी ( दि. २३ ) सकाळच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक अनिल आंद्रे, तुषार सातकर व प्रमोद ओव्हाळ हे घटनास्थळी आले. त्यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. वनरक्षक विभागातील कर्मचाऱ्यांनी यांनी घटनास्थळी येत अपघातातील मृत सांबराचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी घेऊन गेले. 

Web Title: Sambar's death in accident on the national highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.