खामशेत गावच्या हद्दीत रेल्वेने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 03:58 PM2018-01-29T15:58:28+5:302018-01-29T15:59:46+5:30

कामशेत येथील खामशेत गावच्या हद्दीत रेल्वे गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. आप्पासाहेब चुणीलाल वाघ (वय ३५, रा. देहूगाव, गाथा मंदिराच्या जवळ) असे मृताचे नाव आहे.

railway dashing, one person death in Khamshet, Pimpri Chinchwad | खामशेत गावच्या हद्दीत रेल्वेने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू

खामशेत गावच्या हद्दीत रेल्वेने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू

Next

कामशेत : येथील खामशेत गावच्या हद्दीत रेल्वे गाडीने धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. आप्पासाहेब चुणीलाल वाघ (वय ३५, रा. देहूगाव, गाथा मंदिराच्या जवळ) असे मृताचे नाव आहे.
लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. २८ रोजी सायंकाळी सहा ते साडे सहाच्या दरम्यान खामशेत गावच्या हद्दीत एका रेल्वे गाडीची धडक बसून आप्पासाहेब चुणीलाल वाघ यांचा मृत्यू झाला असल्याची खबर सायंकाळी ६.४५ ला मिळाली. त्यानुसार लोणावळा लोहमार्ग पोलीस हवालदार सुहास जाधव हे घटनास्थळी जाऊन त्यांनी पंचनामा केला आहे.

Web Title: railway dashing, one person death in Khamshet, Pimpri Chinchwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.