क्रॉसिंगची घाई, रेल्वेची धडक

By admin | Published: June 14, 2017 12:07 AM2017-06-14T00:07:08+5:302017-06-14T00:07:08+5:30

फाटक बंद असतानाही रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाची दुचाकी रेल्वेखाली चिरडली गेली.

Riding the crossing, | क्रॉसिंगची घाई, रेल्वेची धडक

क्रॉसिंगची घाई, रेल्वेची धडक

Next

दुचाकीचालक जखमी : गुन्हा दाखल, राजापेठची घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : फाटक बंद असतानाही रुळ ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवकाची दुचाकी रेल्वेखाली चिरडली गेली. या अपघातात दुचाकी चालक किरकोळ जखमी झाला. ही घटना सोमवारी उशिरा रात्री राजापेठ रेल्वे क्रॉसिंगवर घडली. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी जखमी दुचाकीस्वार अखिलेश जयंतीलाल आडतीया ( ३१,रा. गोपाल टॉकीजजवळ) याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.
अखिलेश आडतीया हा दुचाकी क्रमांक एमएच २७ एयू-९७०६ घेऊन राजापेठ येथील बंद रेल्वे फाटक ओलाडंत होता. दरम्यान अमरावती-बडनेरा लोकल गाडीने दुचाकीला धडक दिली. या अपघातात सुदैवाने अखिलेश आडतीया किरकोळ जखमी झाले. या अपघातात दुचाकी चकनाचूर झाली. अपघात घडल्यानंतर रेल्वे थांबल्यामुळे रेल्वे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. या घटनेची माहिती शहरात पसरताच बघ्यांची गर्दी जमली. राजापेठ पोलिसांनी घटनास्थळाहून दुचाकी जप्त केली. दुचाकीच्या क्रमांकावरून राजापेठ पोलिसांनी अखिलेश आडतियाविरुध्द भारतीय रेल्वे कायदा १७४, १५० अन्वये गुन्हा नोंदविला. त्याला अटक करण्यात आली.

Web Title: Riding the crossing,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.