णेश तलावातील शेकडो माशांचा मृत्यू, महापालिकेचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 03:23 AM2018-05-11T03:23:27+5:302018-05-11T03:23:27+5:30

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील गणेश तलावातील पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच दूषित पाणी आल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल पक्षी आणि प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

pimpari News | णेश तलावातील शेकडो माशांचा मृत्यू, महापालिकेचे दुर्लक्ष

णेश तलावातील शेकडो माशांचा मृत्यू, महापालिकेचे दुर्लक्ष

googlenewsNext

 पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील सेक्टर २३ मधील गणेश तलावातील पाण्याची पातळी खाली गेल्याने तसेच दूषित पाणी आल्याने माशांचा मृत्यू झाला आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभाराबद्दल पक्षी आणि प्राणी प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक २३ मध्ये आकुर्डीत रेल्वे स्थानकाजवळ गणेश तलाव आहे. या तलावातील गाळ अनेक वर्षे काढला गेलेला नाही. या तलावात चित्रबलाक, खंड्या, वारकरी, बगळे असे विविध पक्षी मोठ्या प्रमाणावर असतात. ‘लोकमत’ने सोमवारच्या अंकात ‘पक्षांची शाळा भरली’ असे वृत्त प्रकाशित केले होते.
पाण्याची पातळी कमी झाल्याने या तलावात चित्रबलाक आले होते. जलचरांचा जीव धोक्यात आणि जल आणि पक्षी, प्राणी वैभव वाचविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, या प्रश्नाकडे ‘लोकमत’ने लक्ष वेधले होते. त्यानंतर उपमहापौर शैलजा मोरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती. गाळ तातडीने काढावा, जलचरांचे संवर्धन करावे, अशी मागणी केली आहे. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उद्यान विभागास तातडीने कारवाईचे आदेश दिले होते. मात्र, दूषित पाण्यामुळे तलावातील अनेक मासे मृत्युमुखी पडले आहेत. सकाळी आठच्या सुमारास अनेक मासे पाण्यावर तरंगत होते. ते खाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षी एकत्रित झाले होते. गुरुवारी सकाळी तलावातील पाणी दूषित, गढूळ झाल्याचे दिसून आले.
माशांचा मृत्यू होण्यास कोण जबाबदार आहे, याची तपासणी करावी, अशी मागणी पक्षीमित्र संघटनांनी केली आहे.

गणेश तलावांच्या गाळ काढण्यासाठी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. गणेश तलावातील पाण्यातून जवळच्या उद्यानांना पाणीपुरवठा होतो. संबंधित उद्यानांचा पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे लवकरच गाळ काढण्यात येईल.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त

दूषित पाण्यासाठी जबाबदार कोण?
गणेश तलावातील गाळ काढण्यासंदर्भात उपमहापौर शैलजा मोरे यांनी महिनाभरापूर्वीच पत्र दिले होते. त्यानंतर माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समिती सदस्य अमित गावडे यांनीही पत्रव्यवहार केला आहे. तसेच नगरसेविका शर्मिला बाबर यांनीही मागणी केली आहे. मात्र, महिनाभरानंतरही पत्रव्यवहारावर कार्यवाही झालेली नाही. गणेश तलावातील अनेक माशांचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी सकाळी दिसून आले. त्यामुळे आज नेहमीपेक्षा पक्ष्यांची संख्याही अधिक असल्याचे दिसून आले. या तलावात सांडपाणीही मोठ्या प्रमाणात येत आहे.

Web Title: pimpari News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.