बदल्यांसाठी अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:47 PM2019-02-23T23:47:48+5:302019-02-23T23:47:52+5:30

महापालिका : बदलीच्या प्रस्तावाला कर्मचाºयांकडून नाही प्रतिसाद

Officers' Frontline for Transfers | बदल्यांसाठी अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी

बदल्यांसाठी अधिकाऱ्यांची मोर्चेबांधणी

Next

पिंपरी : महापालिकेत अधिकारी व कर्मचाºयांची बदलीसाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. सत्ताधाºयांच्या मदतीने इच्छित बदलीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकारी व कर्मचाºयांकडून मागविलेल्या बदलीच्या प्रस्तावाला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.


महापालिकेत साडेसात हजार अधिकारी आणि कर्मचारी आहेत. बांधकाम परवाना, नगररचना, स्थापत्य या विभागात नियुक्ती मिळावी, यासाठी अधिकारी प्रयत्नशील असतात. तर काही कामचुकार अधिकारी पाणीपुरवठा, करसंकलन अशा विभागांत नियुक्ती मिळू नये, यासाठी प्रयत्नशील असतात. अधिकारी आणि कर्मचाºयांच्या बदलीमागे मोठे अर्थकारण असते. तसेच नेत्यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबाव टाकण्याचे कामही केले जाते. सोयीच्या जागांवर नियुक्ती मिळावी, यासाठी अधिकारी आणि कर्मचारी प्रयत्न करतात. एकाच विभागात तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे अधिकारी व कर्मचारी बदलीस पात्र ठरतात. या धोरणानुसार बदलीस पात्र, तसेच वैयक्तिक व वैद्यकीय कारणास्तव बदली हवी असलेल्या कर्मचाºयांची यादी पाठविण्याचे परिपत्रक प्रशासन विभागाने २२ जानेवारीला काढले होते.

यामध्ये गट अ ते क मधील अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश आहे. ३१ जानेवारीपर्यंत बदलीस पात्र कर्मचाºयांचे अर्ज स्वीकारण्यात आले. त्यानुसार गट अ मधील एका अधिकाºयाने बदलीसाठी अर्ज सादर केला आहे. तर गट ब मधील तीन आणि क मधील कर्मचाºयांचा समावेश आहे. त्याचबरोबर गट ड मधील सोळा कर्मचाºयांचा
समावेश आहे.

आचारसंहितेपूर्वी होणार बदल्या
विभागप्रमुखांकडून प्राप्त झालेल्या या सर्व अर्जांची तपासणी करून बदलीस पात्र ठरणारे अधिकारी व कर्मचाºयांची अन्य विभागांत बदली केली जाणार आहे, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले होते. पालिका प्रशासनातर्फे गेल्या आठवड्यात उपअभियंता आणि अभियंता संवर्गातील अधिकारी कर्मचाºयांच्या बदल्या झाल्या. लोकसभा निवडणुकीपूर्वी काही बदल्या होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Officers' Frontline for Transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.