उपसभापतिपदी नेवाळे बिनविरोध

By admin | Published: May 10, 2016 12:37 AM2016-05-10T00:37:45+5:302016-05-10T00:37:45+5:30

पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या उपसभापतिपदी विष्णुपंत नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले यांनी मुदत पूर्ण झाल्याने राजीनामा

Neighbors unopposed as Deputy Chairman | उपसभापतिपदी नेवाळे बिनविरोध

उपसभापतिपदी नेवाळे बिनविरोध

Next

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण मंडळाच्या उपसभापतिपदी विष्णुपंत नेवाळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
शिक्षण मंडळाचे उपसभापती नाना शिवले यांनी मुदत पूर्ण झाल्याने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर केली होती. महापालिकांतील शिक्षण मंडळे २०१७नंतर बरखास्त होणार आहेत. सभापती आणि उपसभापतिपदी सर्वांना संधी मिळावी, यासाठी सहा महिने कालखंड ठरविण्यात आला होता. त्यानुसार उपसभापती शिवले यांचा कालखंड संपल्याने सभापती चेतन भुजबळ यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. या पदासाठी काँग्रेसचे सदस्य विष्णुपंत नेवाळे, राष्ट्रवादीचे सदस्य शिरीष जाधव यांच्या नावाची चर्चा होती. दरम्यान, आज सभापती चेतन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निवडणूक प्रक्रिया पार पडली. या वेळी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर उपस्थित होते. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या मुदतीत नेवाळे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाला. नामनिर्देशन पत्राची छाननी केल्यानंतर अर्ज वैध झाल्याचे सभापतींनी जाहीर केले. उपसभापतिपदासाठी एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने नेवाळे यांची निवड बिनविरोध झाल्याचे जाहीर केले.
या वेळी माजी सभापती चेतन घुले, फजल शेख, विजय लोखंडे, माजी उपसभापती नाना शिवले, धनंजय भालेकर, श्याम आगरवाल, सविता खुळे, लता ओव्हाळ, सदस्य निवृत्ती शिंदे, शिरीष जाधव, तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे आदी उपस्थित होते. या वेळी नेवाळे यांचा सत्कार करण्यात आला.
उपसभापतिपदी काँग्रेसला संधी
पक्षनेत्या मंगला कदम म्हणाल्या, ‘‘शिक्षण मंडळातील सभापती आणि उपसभापती पदांवर सर्व सदस्यांना संधी मिळावी, असा आमचा प्रयत्न होता. या समितीत काँग्रेसचे श्याम आगरवाल आणि विष्णुपंत नेवाळे असे दोन सदस्य होते. आगरवाल यांना यापूर्वीच संधी मिळाल्याने नेवाळे यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला. अजित पवार यांच्या सूचनेनुसारच उपसभापतिपदासाठी नाव सुचविले होते.’’ (प्रतिनिधी)

Web Title: Neighbors unopposed as Deputy Chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.