‘मेट्रो’साठी पर्यावरण पणाला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 06:40 AM2017-07-27T06:40:18+5:302017-07-27T06:40:20+5:30

मेट्रो प्रकल्पाचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जाताना ४८६ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून ओळख असणाºया उद्योगनगरीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे.

Metro, nature , pimpri news | ‘मेट्रो’साठी पर्यावरण पणाला नको

‘मेट्रो’साठी पर्यावरण पणाला नको

Next

पिंपरी : मेट्रो प्रकल्पाचा पहिला मार्ग पिंपरी-चिंचवड शहरातून जाताना ४८६ झाडे बाधित होणार आहेत. त्यामुळे ग्रीन सिटी म्हणून ओळख असणाºया उद्योगनगरीच्या पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. आमचा मेट्रो प्रकल्पाला विरोध नाही. पण, हा प्रकल्प करताना बाधित होणारी झाडांचे पुनर्रोपण व नव्याने वृक्षलागवड करण्याची आवश्यकता आहे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विविध स्वयंसेवी संस्थांनी दिला आहे.
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (महामेट्रो) पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे हॅरिस ब्रिज ते पिंपरी महापालिका असे काम सुरू झाले आहे. त्यामध्ये देशी व परदेशी अशी सुमारे ‘४८६ झाडांचा बळी’ जाणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले. त्यामुळे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरातील स्वयंसेवी संस्थांना विश्वासात न घेता परस्पर झाडे हटविण्याची परवानगी दिल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शिवाय उद्यान विभागाने झाडे वाचविण्यासाठी दिलेली सूचना व भरपाईचा प्रस्ताव महामेट्रोने धुडकाविला आहे.
शहरात कोणताही विकास प्रकल्प उभारताना ‘हरित लवादा’च्या नियमानुसार बाधित होणाºया झाडांचे अगोदर पुनर्रोपण व एका झाडामागे १० झाडांची लागवड करण्याची अट आहे. त्यानुसार कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संस्थांच्या प्रतिनिधींनी दिला आहे.

Web Title: Metro, nature , pimpri news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.