देखाव्यांतून चालू घडामोडींवर भाष्य, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 05:11 AM2017-08-22T05:11:01+5:302017-08-22T05:11:58+5:30

गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे.

Interviews on current affairs, enthusiasm in public circles, among the people | देखाव्यांतून चालू घडामोडींवर भाष्य, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

देखाव्यांतून चालू घडामोडींवर भाष्य, सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

Next

पिंपरी : गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. जिवंत देखाव्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडामोडींवर भाष्य केले जाणार आहे.
लाडक्या गणरायाचे आगमनासाठी सर्वांचीच जोरदार तयारी सुरू आहे. विशेषत: सार्वजनिक मंडळांकडून योग्य नियोजन केले जात आहे. अवघे चारच दिवस शिल्लक असल्याने कार्यकर्त्यांची लगबग सुरू आहे. पिंपरी, चिंचवड, भोसरी, सांगवी, रहाटणी, मोशी, वाकड, थेरगाव या भागात पन्नासहून अधिक वर्षे झालेली जुनी मंडळे आहेत. काही मंडळांनी मूर्तींच्या भव्य देखाव्यांची परंपरा कायम ठेवली आहे, तर काही मंडळे जिवंत देखावे सादर करणार आहेत.
भारत-चीन परिस्थिती, जीएसटी, व्यसनांच्या आहारी जाणारी तरुणाई, मोबाइलचा अतिवापर, पालक-मुलांमधील विसंवाद आदी विषयांवर देखावे सादर केले जाणार आहे. यामध्ये जिवंत देखावे सादर करण्यावर अधिक भर दिला जात आहे. मंडळाच्या कार्यकर्त्यांसह स्थानिक कलाकारांना घेऊन देखावा उभा केला जात आहे. यामुळे स्थानिक कलाकारांनाही कलागुण सादर करण्यास वाव मिळत आहे. ज्वलंत विषयावर देखावे सादर करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी मंडळांनी देखाव्याच्या कॅसेट तयार करण्यासाठी तयारी केली आहे. यासाठी वेगवेगळे आवाजही दिले जात आहेत.
सध्या ठिकठिकाणी मंडप उभारणीचे कामकाज सुरू आहे. शेड उभारणी झाली असून अधिकची सजावटही केली जात आहे.

कार्यकर्त्यांची लगबग
मूर्तीच्या देखाव्यांऐवजी जिवंत देखावे सादर केले जात आहेत. आपला देखावा अधिक सरस व्हावा यासाठी देखाव्याचे कथानकावर अधिक अभ्यास केला जात आहे. चालू घडामोडींसह विनोदी शैलीतून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न मंडळांकडून केला जात आहे. कोणता देखावा असावा, किती पात्र असावेत, संवाद कोणते असावेत आदी गोष्टींवर भर दिला जात आहे. यासह सराव करण्यासाठीही जोरदार तयारी सुरू आहे.

पहिल्या दिवशी देखाव्याचे नियोजन
यंदा १२ दिवस गणेशोत्सव आहे. त्यामुळे गणरायाची भक्ती करण्यासह देखावा सादर करण्यासदेखील १२ दिवस मिळणार आहेत. शहरातील काही भागात सात दिवसांचे, तर काही भागात नऊ दिवसांचे गणपती असतात. त्यामुळे या भागातील कार्यकर्ते प्रतिष्ठापनेच्या पहिल्या दिवशीच देखावा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे.

Web Title: Interviews on current affairs, enthusiasm in public circles, among the people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.